शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दरी रस्त्यावरील पूल कोसळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:22 IST

नाशिक तालुक्यातील दरी, धागूर, आळंदी डॅममार्गे पुढे अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल कमकुवत झाल्याने मध्यम वजनाच्या वाहनांनीच तो हलू लागला असून, सदर पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याची त्वरित देखभाल दुरुस्ती करावी अन्यथा मोठ्या दुर्घटनेला सामोेरे जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मातोरी : नाशिक तालुक्यातील दरी, धागूर, आळंदी डॅममार्गे पुढे अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल कमकुवत झाल्याने मध्यम वजनाच्या वाहनांनीच तो हलू लागला असून, सदर पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याची त्वरित देखभाल दुरुस्ती करावी अन्यथा मोठ्या दुर्घटनेला सामोेरे जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या संदर्भात वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने स्थानिक शेतकºयांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.आळंदी डॅमकडे तसेच दरी व अनेक लहान, मोठ्या गावांना जोडणाºया मुख्य रस्त्यावरील पुलाची अवस्था ही अत्यंत बिकट झाली असून, वाहनधारकांना त्यावरून वाहने नेताना भीती वाटू लागली आहे. याबद्दल स्थानिक नागरिकांनी अनेकदा पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांकडे तक्रारी केल्या, परंतु त्यांनी पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगून त्यांच्याकडे तक्रार करा, असा सल्ला देऊन हात वर केले आहेत. तर बांधकाम खात्याकडे तक्रार केली असता त्यांनी पाटबंधारे खात्याकडे बोट दाखविले आहे. या दोन्ही खात्यांच्या टोलवाटोलवीमुळे या रस्त्याची व त्यावरील पुलाची मालकी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिसरातील गावांना जोडणाºया या रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, पुलावरून वाहन गेल्यास त्याचा स्लॅब पडू लागला आहे.मोठ्या वाहनामुळे तर पुलाला मोठ्या प्रमाणात हादरे बसून पूल कोसळतो की काय असे वाटू  लागते.  त्यामुळे हा पूल कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सदर पुलाचे आॅडिट करून त्याचे बळकटीकरण करावे किंवा सदरचा पूल जमीनदोस्त करून नवीन पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी केली जात असून, तसे न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.आळंदी डॅमकडे तसेच दरी व अनेक लहान, मोठ्या गावांना जोडणाºया मुख्य रस्त्यावरील पुलाची अवस्था ही अत्यंत बिकट झाली असून, वाहनधारकांना त्यावरून वाहने नेताना भीती वाटू लागली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद