चांदवड : चांदवड तालुका दुषकाळी जाहीर करावा तसेच शेतकरी, शेतमजूर व असंघटित कामगारांना पेन्शन देण्याच्या मागणीसाठी सोमवारी चांदवड तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन व साखळी उपोषणास प्रारंभ झाला.हे आंदोलन दोन दिवस चालणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस भास्करराव शिंदे, अॅड. दत्तात्रेय गांगुर्डे, रमजान पठाण, सूर्यभान शिंदे, किरण डावखर यांनी दिली. या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार उपस्थित होते. चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करावा, ६० वर्षांवरील शेतकरी, शेतमजूर असंघटित कामगार यांना ३००० हजार रुपये पेन्शन द्यावी, कांदा जीवनाश्यक वस्तुमधून वगळावा, कांदा आयात बंद करा, कांदा निर्यातमूल्य कमी करा, शेतकऱ्यांचे पीक कर्ज पूर्ण माफ करा, पुणेगाव दरसवाडी कालव्याची चाचणी त्वरित घ्या, यापूर्वी दिलेले रेशनकार्ड नियमित करा. चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात संपतराव जाधव, दशरथ कोतवाल, रामू तात्या ठोेंबरे, निवृत्ती शिंदे, विनायक शिंदे, रमेश कोतवाल, लीलाबाई सस्कर, माधव पिंपरकर, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, तर हे आंदोलन मंगळवार दि. २ सप्टेंबर रोजी ११ ते ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची महिती आयोजकांनी दिली. (वार्ताहर) नाशिक : गणेशोत्सव मिरवणुकीत नागरिकांचे आकर्षण असलेल्या गुलालवाडीतील लेजीम पथकाने खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक सादर केले.
चांदवड तहसीलसमोर धरणे, साखळी उपोषणास प्रारंभ
By admin | Updated: September 1, 2014 21:37 IST