शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अभियानामुळे दहावीची पुरवणी परीक्षा कॉपीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:43 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फ त घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षांमध्ये नाशिक जिल्हा कॉपीमुक्त झाला आहे. नाशिक विभागीय मंडळाने राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे नाशिक जिल्ह्यातील मार्च, फेब्रुवारीच्या परीक्षेतही कॉपी प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फ त घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षांमध्ये नाशिक जिल्हा कॉपीमुक्त झाला आहे. नाशिक विभागीय मंडळाने राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे नाशिक जिल्ह्यातील मार्च, फेब्रुवारीच्या परीक्षेतही कॉपी प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली असून, पुरवणी परीक्षेत हे प्रमाण शून्यावर आणण्यात नाशिक विभागीय मंडळाला यश आहे.  नाशिक जिल्हा संपूर्ण कॉपीमुक्त झाल्यानंतर विभागीय शिक्षण मंडळाने आता नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हेही कॉपीमुक्त करण्याच्या दिशेने नाशिक विभागीय मंडळाने वाटचाल सुरू केली आहे. नाशिक विभागात यावर्षी पुरवणी परीक्षेत संपूर्ण विभागात एकही कॉपी प्रकरण आढळून आले नाही, तर बारावीच्या पुरवणी परीक्षेत आतापर्यंत केवळ ९ कॉपीची प्रकरणे समोर आली असून, ही सर्व प्रकरणे एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे जळगाव वगळता विभागातील नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्हे संपूर्ण कॉपीमुक्त करण्यात नाशिक विभागीय मंडळाला यश आहे. नाशिक विभागात यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत १३२, तर बारावीच्या परीक्षेत २२४ कॉपीची प्रकरणे समोर आली होती. गेल्या चार पाच वर्षांच्या तुलनेत या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून, पुरवणी परीक्षेत जळगावचा अपवाद वगळता नाशिक विभाग कॉपीमुक्त करण्यात विभागीय शिक्षण मंडळाला यश आले आहे.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी