शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी परत मिळविण्यासाठी शेतकºयांच्या प्रशासनाच्या दारी चकरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:32 IST

नाशिक : रेशीम उद्योगासाठी शेतजमिनी खरेदी करून त्यांच्या उद्योगासाठी अथवा औद्योगिक वापर न करता परस्पर विकणाºयांविरोधात दिंडोरी तालुक्यातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दावा दाखल करून संबंधित जमिनी शेतकºयांना परत मिळाव्या, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे. परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात आपणास ...

नाशिक : रेशीम उद्योगासाठी शेतजमिनी खरेदी करून त्यांच्या उद्योगासाठी अथवा औद्योगिक वापर न करता परस्पर विकणाºयांविरोधात दिंडोरी तालुक्यातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दावा दाखल करून संबंधित जमिनी शेतकºयांना परत मिळाव्या, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे. परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात आपणास कोणही दाद देत नसल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.दिंडोरी तालुक्यातील मौजे उमराळे खुर्द, नळवाडी, ओझे, निगळडोळ, जालखेड गोळशी, कोकणगाव, वणी, टिटवे, वांजुळे या गावच्या शेतकºयांनी १९९४-९५च्या सुमारास सुमारे चारशे हेक्टर शेतजमीन शेतजमीन उद्योगासाठी दिली होती. उद्योजकांनी शेतजमीन मालकांच्या मुलांना नोकºया देण्याचे आमिष दाखवून जमिनी खरेदी केल्या. परंतु येथे कोणताही उद्योग सुरू झाला नाही, तर या जमिनी अधिक नफा कमावून विकू न शेतकºयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. त्यामळे या जमिनी परत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २७ जुलैलाच दावा दाखल केला असल्याचे शेतकºयांनी सांगितले. परंतु, एक महिना उलटूनही शेतकºयांच्या अर्जावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित गावांमधील शेतकरी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात फेºया मारत असून, आपल्या मागण्यांची कैफियत कोणीही ऐकून घेत नसल्याचा आरोप देवीदास नवले, सुनील ढाकणे, मधुकर गोडसे, शिवाजी हिरे, भास्कर गोडसे, किरण ढाकणे, ज्ञानेश्वर शिंदे, वाल्मीक घडवजे, तुळशीराम गोजरे आदि शेतकºयांनी केला आहे.