शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात शुकशुकाट ; व्यापाऱ्यांचा स्वयंस्पूर्तीने लॉक डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 13:38 IST

शहरातील कापड विक्रेते, सराफी व्यावसायिकांसह किराणा व्यावसायिकांनीही स्वयंस्फूर्तींने लॉकडाऊन करीत शंभर टक्के दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूचे कडेकोट पालन केले. जनता कर्फ्यूच्या माध्यमातून नाशिककारंनी कोरोनाविरोधी लढा जिंकण्यासाठी निर्धार केला आहे. त्यामुळे  शहरातील घाऊक कापड विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेते, रेडीमेड व होजिअरी कापड विक्रेत्यांनीही रविवारी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली

ठळक मुद्देसराफ बाजार सलग तीन दिसऱ्या दिवशीही बंदकापड बाजाराच दोन दिवसांपासून शटर डाऊनसलून व ब्युटी पार्लर्सही दोन दिवसापासून बंद

नाशिक : कोरोना वायरसच्या प्रतिबंधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांनी केलेल्या जनता कर्फ्यू पाळण्याच्या आवाहनाला नशिककरांनी उत्स्फूर्त रविवारी (दि.२२) प्रतिसाद दिला. शहरातील कापड विक्रेते, सराफी व्यावसायिकांसह किराणा व्यावसायिकांनीही स्वयंस्फूर्तींने लॉकडाऊन करीत शंभर टक्के दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूचे कडेकोट पालन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सराफव्यावसायिकांनी गेल्या तीन दिवसांपासून त्यांची शहरातील सर्व दुकाने बंद ठेवली आहे. त्यामुळे बाजारातील प्रतिदिन होणारी ५० कोटी या प्रमाणे जवळपास दिडशे कोटींची उलाढाल ढप्प झाली आहे, परंतु, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी व्यावसायिकांनी राष्ट्र कर्तव्य म्हणून त्यांची दुकाने  स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली आहे.  ग्राहकांचे आरोग्य आमच्या साठी सर्वाधिक महत्वाचे असून त्यासाठीच सर्व सराफ व्यावसायिकांनी उत्स्फर्तपणे जनता कर्फ्यूमध्ये सहभाग घेतल्याची प्रतिक्रिया सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेनत राजापूरपक यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली आहे.

जनता कर्फ्यूच्या माध्यमातून नाशिककारंनी कोरोनाविरोधी लढा जिंकण्यासाठी निर्धार केला आहे. त्यामुळे  शहरातील घाऊक कापड विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेते, रेडीमेड व होजिअरी कापड विक्रेत्यांनीही रविवारी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली. त्याचप्रमाणे मेनरोड, शालीमार, कॉलेजरोड, गंगापूररोड, पंचवटी, दिंडोरीरोड, मखमलाबाद आडगाव  द्वारका, मुंबई नाका,  सिडको, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, परिसरातील विविध  दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद ठेवत जनता कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदवला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकShoppingखरेदीMarketबाजार