शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत जिल्ह्यात लसीकरणाचा ड्राय रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 01:56 IST

देशपातळीवर कोरोना लसीकरणाचा ड्राय रन काही ठराविक जिल्ह्यात झालेला असताना प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला तयारीचा भाग म्हणून त्याचबरोबर नागरिकांमध्ये या लसीकरणाविषयी संभ्रम दूर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात येत्या दोन दिवसात लसीकरणाचा ड्राय रन घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

ठळक मुद्देआढावा : वैद्यकीय अधिकाऱ्यांना देणार लस 

नाशिक : देशपातळीवर कोरोना लसीकरणाचा ड्राय रन काही ठराविक जिल्ह्यात झालेला असताना प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला तयारीचा भाग म्हणून त्याचबरोबर नागरिकांमध्ये या लसीकरणाविषयी संभ्रम दूर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात येत्या दोन दिवसात लसीकरणाचा ड्राय रन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यात जिल्ह्यातील २५ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावेळी प्रत्यक्ष लस देण्यात येऊन त्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. देशपातळीवर कोरोना प्रतिबंध लसीकरणाला चालू महिन्यात प्रारंभ करण्यात येणार असून, त्याची तयारी म्हणून गेल्या आठवड्यात देशपातळीवर लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला. राज्यात नंदुरबारसह चार ठिकाणी यापूर्वी चाचणी घेण्यात आली. यंत्रणेच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व महापालिका क्षेत्रात येत्या दोन दिवसात ड्राय रन घेण्याचे नियोजन केले जात आहे. या संदर्भात बुधवारी जिल्हा रूग्णालयात तयारीची बैठक घेण्यात आली. या रनसाठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व जिल्हास्तरीय रूग्णालय अशा ठिकाणी तर महापालिका क्षेत्रातही मनपा रूग्णालयाची निवड करण्यात आली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकCorona vaccineकोरोनाची लस