शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:44 IST

नाशिक : अवकाळी पावसाने काही भागातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून तपमानाचा पार घसरल्याने शहर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून, तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीचे प्रमाण वाढल्याने काढणीला आलेल्या बागांमध्ये मणी तडकण्याचे प्रमाण वाढल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्दे शहर परिसरात कडाक्याची थंडी द्राक्षमणी तडकण्याचे प्रमाण वाढले

नाशिक : अवकाळी पावसाने काही भागातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून तपमानाचा पार घसरल्याने शहर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून, तपमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. थंडीचे प्रमाण वाढल्याने काढणीला आलेल्या बागांमध्ये मणी तडकण्याचे प्रमाण वाढल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.आधी बेमोसमी पावसाचा फटका आणि नंतर सलग ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना वाचविण्यासाठी कीटकनाशके व औषधांची फवारणी करून वाचवलेल्या द्राक्षबागा आता कडाक्याच्या थंडीमुळे संकटात सापडल्या असून, मणी तडकण्याचे प्रमाण वाढले आहे. काढणीला आलेल्या मालाचे अशाप्रकारे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. नाशिक शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत वातावरणात कमालीचे चढ-उतार होत आहेत. दिवाळीपश्चात वातावरणात गारवा निर्माण होऊ लागला असताना मध्येच उकाड्याचे प्रमाण वाढले. दिवसा उष्मा तर रात्री काहीसे थंड असे वातावरण कायम आहे. त्यामुळे धड ना थंडी ना उकाडा अशी दोलायमान अवस्था असताना काही दिवसांपूर्वी बेमोसमी पावसाने द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले. या पावसानंतर वातावरणात बदल होऊन सलग दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे मण्यांची गळ होणे, द्राक्षमणी तडकणे, द्राक्षमण्यांवर भुरी येणे, तसेच डावण्या व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला.द्राक्षमणी तडकण्याचे प्रमाण वाढलेसंक ट टाळण्यासाठी शेतकºयांना अंतिम टप्प्यात महागड्या औषधांची फवारणी करावी लागली. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आता माल काढणीला आला असताना तपमान घसरल्याने द्राक्षमणी तडकण्याचे प्रमाण वाढल्याने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.