शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

मद्यपींकडून तरुणावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: June 13, 2014 00:23 IST

मद्यपींकडून तरुणावर प्राणघातक हल्ला

 

पंचवटी : दारू पिण्यास मज्जाव केल्याचा राग आल्याने तिघा मद्यपींनी तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. गंगाघाटावर भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काहीशी धावपळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यासंदर्भात दाखल झालेल्या फिर्यादीसुनार रवि अण्णा उगले (२०), राजेश रवींद्र सूर्यवंशी (२०) पंचवटी व अभिजित दिलीप म्हैसधुणे (२१) सर्व राहणार रामवाडी हे गंगाघाटाजवळील एका शौचालयालगत मद्यपान करीत असताना, संतोष यशवंत ढोले (रा. रोहिणीनगर, पेठरोड) याने त्यांना या ठिकाणी दारू पिऊ नका असे सांगितले. याचा राग आल्याने या तिघांनी संतोष यास बेदम मारहाण केली. यातील संशयित राजेश सूर्यवंशी याने त्याच्याजवळील चाकूने पवार याच्या पोटावर सपासप वार केल्याने तो गंभीर जखमी होऊन कोसळला, तर इतरांनी दारूच्या बाटल्या फोडून वार केले. या हल्ल्यात पवार गंभीर जखमी झाला असून, त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिनेस्टाईल पद्धतीने घडलेल्या या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे. या ठिकाणी अनेक गुंडांचे वास्तव्य असून, नेहमीच येथे गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत असतात. कित्येकदा पर्यटकांनादेखील वेठीस धरले जाते. वाढत्या गुन्हेगारीवर वेळीच आवर घालावा, अशी मागणी येथील त्रस्त व्यापारी आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी केली आहे. (वार्ताहर)