मालेगाव : मालेगाव कुसुंबा रस्त्यावर दहिदी-हाताणे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दीड वर्षे वयाच्या बिबट्या ठार झाला असून याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध वन विभाग कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी पहाटे हा अपघात झाला. हाताणे-दहिदी शिवारात अज्ञात वाहनाने नर जातीच्या दीड वर्षाच्या बिबट्याला धडक दिली. या धडकेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे, वनपाल भानुदास सूर्यवंशी, अतुल देवरे यांना मिळताच त्यांनी मृत बिबट्या लोणवाडे शिवारातून नर्सरीत आणला. या ठिकाणी तालुका पशुसंवर्धन अधिकारी जावेद खाटीक यांनी बिबट्याचे विच्छेदन केले. यानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दहिदी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:42 IST