शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

त्र्यंबकेश्वरमध्ये तरुणींना छेडणाऱ्या मद्यपींची ‘झिंग’ उतरविली; नेकलेस धबधब्याजवळ धो-धो धुतले

By अझहर शेख | Updated: July 31, 2023 16:30 IST

शहरातून वीकेण्डला त्र्यंबकेश्वरच्या पहिनेबारी पर्यटनस्थळावरील नेकलेस धबधबा बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात.

नाशिक : त्र्यंबकेश्वरजवळील पहिनेबारी येथील पर्यटनस्थळावर तरुणींना छेडणाऱ्या मद्यपींच्या टोळक्याला स्थानिक गावकरी युवकांनी ‘गावाचे नाव बदनाम करू नका...’ असे म्हणत हटकले असता मद्यपींनी त्या दोघा युवकांना मारहाण केली. यावेळी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत मद्यपींना तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यासाठी हातात दगड उचलून मद्यपींनी शिवीागाळ सुरू केली. यामुळे कमर्चाऱ्यांनी या आठ मद्यपींच्या टोळीला पाण्यातच काठ्यांचा ‘प्रसाद’ देत ‘नशा’ उतरविली.

शहरातून वीकेण्डला त्र्यंबकेश्वरच्या पहिनेबारी पर्यटनस्थळावरील नेकलेस धबधबा बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. त्र्यंबकेश्वर भागात पावसाची दमदार हजेरी असल्याने याठिकाणी निसर्ग बहरला आहे. हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणाची मोहिनी पर्यटकांना पडू लागली आहे. याठिकाणी नाशिककर आपल्या सहकुटुंबासह पर्यटनाला जातात. तसेच त्र्यंबकेश्वरला विविध राज्यांतून येणारे भाविक पर्यटकही याठिकाणी पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना दिसतात. याचवेळी नाशिक शहरामधील दहा तरुणांच्या ग्रूपपैकी आठ मद्यपींनी याठिकाणी धुडगूस घालत येथील गावकऱ्यांच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या तपासणीनाक्यावर हुल्लडबाजी केली.

प्रवेश शुल्क भरून पावती घेण्यास नकार दिला. यावेळी मद्यपींना चालणेदेखील अवघड होत असल्याचे लक्षात येताच समितीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना धबधब्याजवळ जाण्यापासून नाक्यावरच रोखले. यावेळी त्यांनी चोरवाटेने जंगलात प्रवेश केला व धबधब्याजवळ दोन तरुणींना छेडले. हा प्रकार येथे असलेल्या दोन स्थानिक युवकांनी बघितला असता त्यांना हटकले. त्याचा राग मनात धरून संशयित आठ मद्यपींच्या टोळीने दोघांना जबर मारहाण केली, अशी माहिती त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

प्रवेश शुल्क गावाच्या विकासासाठीनाशिक पश्चिम वनविभागाच्या त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील पहिने गावाच्या विकासासाठी शासनआदेशानुसार वनपरिक्षेत्र कार्यालयाने ‘पहिने संयुक्त वन व्यवस्थापन समिती’ गठीत केली आहे. या समितीकडून पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून नाममात्र प्रवेश शुल्क आकारणी केली जाते. जमा होणारा महसूल गावाच्या विकासासाठी वापरला जातो, असा दावा वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांनी केला आहे. या महसूलामधून पर्यटकांसाठी याठिकाणी सोयीसुविधाही पुरविण्याचा प्रयत्न वनविभागाकडून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिने बारी हे पर्यटनस्थळ राखीव वन आहे. या भागात पर्यटनाचा आनंद नागरिकांनी अवश्य घ्यावा; मात्र संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांना, वनरक्षकांना सहकार्य करावे. त्यांच्या सुचनांचे पालन करत सुज्ञ, सुजाण नागरिकाची भूमिका बजवावी. आपल्यामुळे कोणाच्या आनंदाचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी. गैरवर्तन, अश्लील चाळे, मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्यांवर वन गस्तीपथकाद्वारे वन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

- राजेश पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, त्र्यंबकेश्वर

टॅग्स :Nashikनाशिक