शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवर्षणग्रस्त परिसराचे पालटले रुपडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 13:44 IST

मेशी : वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त असलेल्या देवळ्याच्या पूर्व भागातील मेशी- डोंगरगाव रस्त्यालगतची विस्तीर्ण वनराई यंदा समाधानकारक पावसामुळे बहरली असून वनौषधींचे आगर म्हणून परिचित असलेल्या या परिसराचे यंदा रुपडे पालटल्याचे दिसून येत आहे.

मेशी : वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त असलेल्या देवळ्याच्या पूर्व भागातील मेशी- डोंगरगाव रस्त्यालगतची विस्तीर्ण वनराई यंदा समाधानकारक पावसामुळे बहरली असून वनौषधींचे आगर म्हणून परिचित असलेल्या या परिसराचे यंदा रुपडे पालटल्याचे दिसून येत आहे. यावर्षी जून महिन्याच्या आरंभापासूनच चांगला पाऊस होत असल्याने नैसर्गिकरीत्या लाभलेले जंगल हिरवेगार झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा डोंगररांगासह सुमारे बाराशे हेक्टर क्षेत्रातील विस्तीर्ण वनराई पसरलेली आहे. या जंगलात विविध वनौषधी आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हा परिसर अवर्षणग्रस्त झालेला होता. त्यामुळे जंगलाचे संगोपन आणि संवर्धन फारशा प्रमाणात झालेले नव्हते. कारण पाण्याअभवी असंख्य झाडे, झुडपे वाळत चालली होती. वनविभागाने अथक परिश्रम घेऊनही जंगलाचा चेहरामोहरा फारसा बदलत नव्हता परंतु मागील वर्षीही चांगला पावसाळा होता आणि याहीवर्षी चांगला पाऊस होत असल्याने जंगल परिसर हिरव्या शालूने नटल्यासारखा दिसू लागला आहे. दरवर्षी समाधान पाऊस राहिल्यास ही वनराई पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ शकते. आजही या जंगलात विविध वनौषधीबरोबरच अनेक प्रकारची जंगली श्वापदांचेही रहिवास आहे. मेशी, डोंगरगाव, खारीपाडा येथील वनकमिटी तसेच वनविभागानेही जंगल संवर्धनाची जागरूकता कायम ठेवण्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक