शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पोळा सणावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:26 IST

देवगाव : वर्षभर राब-राब राबणाऱ्या बैलांच्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. देवगाव येथील सोमवारच्या आठवडे बाजारपेठेत पोळा सणाचे साहित्य खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते.

ठळक मुद्दे बैलपोळा सण आला तरी तालुक्यातील बाजारपेठ मात्र ठप्पच आहे.

देवगाव : वर्षभर राब-राब राबणाऱ्या बैलांच्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. देवगाव येथील सोमवारच्या आठवडे बाजारपेठेत पोळा सणाचे साहित्य खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते.देवगाव व परिसरात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकºयांच्या दृष्टीने हा पोळा सण महत्वाचा असल्याने मंगळवारी देवगाव आठवडे बाजारात लाडक्या सर्जा-राजाला सजवण्याचे साहित्य खरेदी करतांना शेतकरी हताश होत काहिसा काटकसर करतांना दिसला.कुठल्याच भाजीपाल्याला समाधानकारक बाजारभाव नाही. परिसरात मुख्य पिक असलेल्या कांदा दर दिवसेदिवस उतरत आहे. उत्पादन खर्चापेक्षा अत्यल्प किमतीत कांदा विकावा लागल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीचे परिणाम शुक्र वारच्या बैलपोळा सणाच्या खरेदिवर दिसुन आले. दि.३० रोजी बैलपोळा सण आला तरी तालुक्यातील बाजारपेठ मात्र ठप्पच आहे.दरवर्षीप्रमाणे यंदा शेतकरी वर्गात बैल साज खरेदीचा विशेष उत्साह दिसत नसल्याचे काही व्यापाºयांनी सांगितले. सतत राब-राब राबणाºया बैलाप्रती प्रेम व्यक्त करण्याचा पोळा हा एकमेव दिवस असल्याने कमी प्रमाणात का होईना या देवगाव आठवडे बाजारात शेतकरी साज खरेदी करताना दिसत होते.प्रतिक्र ीया .....शेतमालाचे उतरलेले बाजारभाव व अत्यल्प पावसामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. या पाशर््वभुमीवर पोळा सणाच्या खरेदीवर त्याचा परिणाम दिसला आहे. शेतात वर्षभर राबणाºया बैलांच्या प्रेमापोटी कमी प्रमाणात का होईना पोळा सणाचे साहित्य खरेदी आज केली.- गोपिनाथ मेमाणे, शेतकरी. महादेवनगर.प्रतिकिया ......सालाबादप्रमाणे यंदाही सजावटीचे मोठ्या प्रमाणात साहित्य विक्र ी करण्यासाठी आणले. मात्र, या वर्षी पावसाने पाठ फिरवली. त्यातच शेतीमालाला देखील बाजारभाव नसल्याने शेतकºयांची आर्थिक अडचण असल्याने सजावटीसाठी सर्व नवीन साहीत्य घेण्यास टाळाटाळ करीत असुन, हात आखडता घेतांना दिसून येत आहे. महागाईमुळे ग्राहक भाव विचारु न पुढे निघुन जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.- गणेश लोहारकर, साहित्य विक्र ेता, देवगाव.