लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू झाली असून, त्यामुळे अनेक रस्ते चिखलमय झालेले दिसून येत आहेत. यामुळे पादचाऱ्यांची तसेच दुचाकी चालकांची मोठी पंचाईत होत असलेली दिसून येत आहे.गेले काही दिवस मुसळधार बरसणाºया पावसाने दोन दिवस विश्रांती घेतल्याने रस्ते काहीसे वाळले होते. त्यानंतर शुक्रवारपासून पाऊस परतला असला तरी आता त्याची रिपरिप सुरू असते. त्यामुळे शहरातील विविध रस्त्यांवर सध्या मोठ्या प्रमाणावर चिखल झालेला दिसून येत आहे.अनेक ठिकाणी पदपथ नसल्यामुळे पादचाऱ्यांना या चिखलामधूनच रस्ता काढावा लागत असतो. त्यामुळे चालतांना त्यांचे होल होतात. तसेच या चिखलामधून दुचाकी चालविताना चालकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असतो. चिखलामुळे दुचाकी घसरून होणाºया अपघातांची संख्या वाढलेली आहे.
पावसाची रिपरिप; रस्ते चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:15 IST
नाशिक : शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू झाली असून, त्यामुळे अनेक रस्ते चिखलमय झालेले दिसून येत आहेत. यामुळे पादचाऱ्यांची तसेच दुचाकी चालकांची मोठी पंचाईत होत असलेली दिसून येत आहे.
पावसाची रिपरिप; रस्ते चिखलमय
ठळक मुद्देदुचाकी घसरून होणाºया अपघातांची संख्या वाढलेली आहे.