नाशिक : कारसाठी चालक म्हणून नोकरीस ठेवलेल्या इसमानेच कार चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील सावरकर नगरमध्ये घडली आहे़ आकाशवाणी टॉवरजवळील राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या स्विफ्ट कारसाठी (एमएच ०२, बीजे ३५५१) चालक म्हणून एकास नोकरीस ठेवले होते़ सोमवारी (दि़ २१) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास संदीप फाउंडेशन येथे जाऊन येतो असे सांगून चालक कार घेऊन गेला तो परतलाच नाही़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
चालकानेच केली कारची चोरी
By admin | Updated: October 3, 2015 23:30 IST