नाशिक : वातावरणातील बदल आणि पाण्याची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता फळपिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने दादासाहेब गायकवाड सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, एनआरसी पुण्याचे संचालक एस. डी. सावंत, केंद्रीय कृषी मंत्रालयातील कृषी सल्लागार दीपेंद्र चव्हाण, कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव आदि उपस्थित होते. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, पावसाचे प्रमाण मर्यादित असून, धरणांची क्षमता तत्काळ वाढविणे शक्य नाही. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी पाण्याच्या योग्य नियोजनाची गरज आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे.
फळ पिकांसाठी ठिबक सिंचन गरजेचे
By admin | Updated: October 9, 2015 01:18 IST