शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

रातोरात काढले : पोलिसांकडून चौकशी सुरू भिडे, एकबोटे यांचे पोस्टर्स गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:40 IST

नाशिक : कोरेगाव-भीमा येथील जातीय दंगल प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे व हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे हे दोघे ‘वॉन्टेड’ असल्याचे शहरात झळकलेले पोस्टर्स गुरुवारी रातोरात काढून टाकण्यात आले.

ठळक मुद्देठिकठिकाणी भिडे, एकबोटे यांचे पोस्टर्ससंपर्कासाठी पुणे पोलिसांचे दूरध्वनी क्रमांक

नाशिक : कोरेगाव-भीमा येथील जातीय दंगल प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे व हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे हे दोघे ‘वॉन्टेड’ असल्याचे शहरात झळकलेले पोस्टर्स गुरुवारी रातोरात काढून टाकण्यात आले असून, ते कोणी लावले व कोणीकाढले याविषयीचे गूढ वाढले आहे. राज्यात सामाजिक सलोखा निर्माण झालेला असताना अशा प्रकारे पुणे पोलिसांच्या नावाचा वापर करून ठिकठिकाणी भिडे, एकबोटे यांचे पोस्टर्स लावून शांतता भंग करण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी सुरू केल्याने त्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.गुरुवारी नाशिक शहरातील जुने मध्यवर्ती बसस्थानक, ठक्कर बाजार बसस्थानक, शालिमार चौक, अशोकस्तंभ, नाशिकरोड रेल्वेस्थानक, प्रवासी वाहतूक करणाºया एसटी बसेसला मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स लावून त्यात ते ‘वॉन्टेड’ असल्याचे नमूद करण्यात आले होते. पोस्टर्सवर संपर्कासाठी पुणे पोलिसांचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आल्याने जणू काही पोलिसांनीच सदरचे पोस्टर्स लावले आहेत, असे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पुणे पोलिसांनी पोस्टर्सचा इन्कार करीत पुणे पोलिसांकडून अशाप्रकारे कोणतेही पोस्टर्स लावण्यात आले नसल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले. या पोस्टर्समुळे शहरात मात्र खळबळ उडाली होती. स्थानिक पोलीस प्रशासनाला मात्र याची कोणतीही माहिती नव्हती. यानिमित्ताने पोलिसांची कुचकामी यंत्रणाही समोर आली. शहराच्या मध्यवर्ती भागात पोस्टर्स लावूनही स्थानिक पोलिसांना याची भणक लागली नाही, हे विशेष.कोरेगाव-भीमा प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू असून, भिडे व एकबोटे यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी पोलिसांत तक्रार दाखल असल्याने त्याची स्वतंत्र चौकशी पोलीस खात्याकडून सुरू आहे. असे असताना दोघेही वॉन्टेड असल्याच्या पोस्टर्समुळे पुन्हा सामाजिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून केला जात असल्याची बाब गंभीर असताना, नाशिक पोलीस याविषयी अनभिज्ञ आढळून आले. सदर प्रकाराची शहरात कुजबुज सुरू झाल्यानंतर गुरुवारी मध्यरात्रीच शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर्स काढून घेण्यात आले. याचाही पोलिसांना पत्ता लागला नाही.पोलिसांकडून चौकशीगुरुवारी यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शहरात या घटनेबाबत कुजबुज सुरू झाली होती. मात्र तत्पूर्वीच अज्ञात व्यक्तींनी सदरचे पोस्टर्स फाडून टाकले. या घटनेमध्ये संशयितांनी पोस्टर्स लावणे आणि ते काढून घेण्यापर्यंत मजल मारली असतानाही स्थानिक पोलीस यंत्रणेला कोणतीही माहिती नव्हती. या घटनाक्रमामुळे पोलीस यंत्रणा सावध झाली असून, अचानक पोस्टर्स लावणे व ते काढून घेणे या दोन्ही बाबी संशयास्पद असून, नाशिक पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विजय मगर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.