शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

   नाट्य रसिकांनाही मिळावा सवलतीचा लाभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 21:15 IST

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दहा महिन्यांपासून ठप्प झालेली रंगभूमी पुन्हा पूर्वीप्रमाणेच बहरावी यासाठी महापालिकेने भाड्यात निम्मी कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता नवीन वर्षात कालिदासचा पडदादेखील उघडणार असला तरी मनपाने दिलेल्या सवलतीचा काही लाभ सामान्य रसिकांनादेखील होणे आवश्यक असल्याचा सूर नाट्यप्रेमी रसिकांनी व्यक्त केला आहे. 

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दहा महिन्यांपासून ठप्प झालेली रंगभूमी पुन्हा पूर्वीप्रमाणेच बहरावी यासाठी महापालिकेने भाड्यात निम्मी कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता नवीन वर्षात कालिदासचा पडदादेखील उघडणार असला तरी मनपाने दिलेल्या सवलतीचा काही लाभ सामान्य रसिकांनादेखील होणे आवश्यक असल्याचा सूर नाट्यप्रेमी रसिकांनी व्यक्त केला आहे. कालिदासमध्ये वर्षाच्या प्रारंभीच्या आठवड्यातच नाटकाचा शुभारंभ होत आहे. प्रारंभीचे नाटक सामाजिक असल्याने संबंधित संस्थेच्या वतीने ते मोफत दाखवले जाणार आहे. मात्र, त्यानंतर जेव्हा व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होतील, त्यावेळी त्या नाटकांचे प्रयोग पूर्वीच्याच दराने करणे  व्यावसायिकांना  क्रमप्राप्त आहे. आधीच सामाजिक अंतर राखून प्रेक्षकांची आसनव्यवस्था करावी लागणार असल्याने त्यांना निम्मीच तिकीटे विकता येणार आहेत. तसेच प्रेक्षकांची चाचणी, त्यांची सुरक्षितता, सभागृहाचे सॅनिटायजेशन या सर्व बाबींचा भार आधीच त्यांच्यावर पडणार आहे. त्यामुळे नागरिकांना अजून तिकीट दरात काही सवलत देणे त्यांना शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत महापालिकेने ज्याप्रमाणे वर्षभरासाठी कालिदासच्या भाड्यात निम्मी कपात करुन नाट्यव्यावसायिकांना काहीसा दिलासा आहे, त्याचप्रमाणे नाट्य रसिकांनादेखील अल्पसा तरी दरात दिलासा देण्याची रसिकांची मागणी आहे. नाटके चालविण्यात नाट्यरसिकांचे योगदान मोलाचे असते. कोरोना काळात प्रत्येक नागरिकालाच आर्थिक ओढाताणीचा सामना करावा लागला आहे. मात्र, तशा परिस्थितीतही प्रेक्षक पुन्हा नाट्यगृहांकडे वळण्यास तयार आहे. परंतु, त्यासाठी त्यांनादेखील नाटकांच्या तिकीट दरात सवलत मिळाल्यास ते अधिक प्रमाणात पुन्हा नाटकांकडे परतू शकतील. त्यातून पुन्हा रंगभूमी बहरण्याच्या प्रक्रीयेला गती येऊ शकेल. त्यामुळे पडत्या काळातील रंगभूमीला सावरण्यासाठी महापालिकेने नाट्यरसिकांच्या मागणीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. 

टॅग्स :NashikनाशिकMuncipal Corporationनगर पालिका