शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

नाशिकमध्ये नाटक प्रेक्षकांच्या दारी...

By admin | Updated: September 13, 2014 21:58 IST

नाशिकमध्ये नाटक प्रेक्षकांच्या दारी...

नाशिक : नाटकांना प्रेक्षकांचा लाभणारा अत्यल्प प्रतिसाद आणि हौशी नाट्यसंस्थांनाही न पेलणारा आर्थिक भार यामुळे मराठी रंगभूमी एका संक्रमण अवस्थेतून जात असताना, तरुण आणि कल्पक रंगकर्मींचा समावेश असलेल्या मयूरी थिएटरने नाट्यकलेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी ‘नाटक प्रेक्षकांच्या दारी...’ हा उपक्रम राबविण्याचा निर्धार केला असून, शहरात जिथे पुरेशी जागा उपलब्ध होईल तिथे दीर्घांकांचे प्रयोग केले जाणार आहेत. त्याची सुरुवात शनिवारी लोकहितवादी मंडळाच्या ज्योति कलश सभागृहापासून झाली.व्यावसायिक नाटकांचा खालावलेला दर्जा, काही चांगल्या नाटकांना मिळणारा अत्यल्प प्रतिसाद आणि स्पर्धांपुरताच दिसणारा हौशी रंगकर्मी यामुळे मराठी रंगभूमी आपल्या अस्तित्वाशी झुंज देत आहे. नाट्यगृहाकडे प्रेक्षकांना खेचून आणण्यासाठी रंगभूमीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग केले जात असले, तरी या प्रयोगांनाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यापूर्वी नाशकात प्रयोग परिवाराच्या माध्यमातून अल्पदरातील प्रेक्षक सभासद योजना राबविण्यात आली होती. परंतु आजचा महागाईचा दर लक्षात घेता यासारख्या योजना राबविणे शक्य नाही. मराठी रंगभूमीवरील बरेचसे कलावंतही चित्रपट आणि वाहिन्यांवरील मालिकांमध्ये व्यस्त झाले आहेत. हजाराहून अधिक प्रयोग झालेली नाटके आता रंगभूमीवरून एक्झिट घेत आहेत. एखादे नाटक व्यावसायिक पातळीवर उभे करून ते चालविणे आता सोपे राहिलेले नाही. अशा स्थितीतही मराठी रंगभूमीकडे प्रेक्षकांना पुन्हा एकदा खेचून आणण्यासाठी शहरातील काही धडपडणाऱ्या युवा रंगकर्मींनी नवा प्रयोग राबविण्याचा निर्धार केला आहे. मयुरी थिएटरच्या वतीने ‘नाटक प्रेक्षकांच्या दारी...’ हा उपक्रम राबविला जाणार असून, शहरात जेथे-जेथे ५० ते २०० आसन क्षमतेचे सभागृह, नाट्यगृह, अ‍ॅम्पी थिएटर्स असतील तेथे ‘निवडीत अवकाश’ आणि ‘स्टालिन’ या दीर्घांकांचे प्रयोग केले जाणार आहेत. त्यानुसार दि. १३ सप्टेंबरला लोकहितवादी मंडळ, दि. १२ आॅक्टोबर रोजी ऋतुरंग अ‍ॅम्पी थिएटर, नाशिकरोड, दि. १३ आॅक्टोबर रोजी कालिदास कलामंदिर, दि. २० आॅक्टोबर रोजी कुसुमाग्रज स्मारक याठिकाणी प्रयोग सादर केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)