शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नाटक अन् प्रेयसीच्या प्रेमाची कलाकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:52 IST

नाट्य दिग्दर्शकाचे नाटकासोबतच प्रेयसीवर जडलेले प्रेम आणि या प्रेमातूनच निर्मिती झालेली कलाकृती युवा कलाकारांनी आपल्या अभिनयातून रंगमंचावर साकारली. प्रेमाचा त्रिकोण असलेल्या ‘तो, ती आणि नाटक’ या एकांकिकेने रसिकांची दाद मिळविली.

नाशिक : नाट्य दिग्दर्शकाचे नाटकासोबतच प्रेयसीवर जडलेले प्रेम आणि या प्रेमातूनच निर्मिती झालेली कलाकृती युवा कलाकारांनी आपल्या अभिनयातून रंगमंचावर साकारली. प्रेमाचा त्रिकोण असलेल्या ‘तो, ती आणि नाटक’ या एकांकिकेने रसिकांची दाद मिळविली. तसेच दररोजच रविवार जगता आला तर...? या प्रश्नाचे युवा कलावंताकडून ‘एव्हरी डे इज संडे’ या एकांकि केतून उत्तर शोधण्याचा प्रयत्नही प्रेक्षकांना चांगला भावला.निमित्त होते, सार्वजनिक वाचनालय नाशिक व परशुराम साईखेडकर नाट्यगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प.सा. नाट्ययज्ञाच्या पाचव्या पुष्पाचे. नाट्यसेवा थिएटर्स निर्मित प्रिया जैन लिखित आणि आनंद/कृतार्थ दिग्दर्शित ‘तो, ती आणि नाटक’ व शंतनू चंद्रात्रे लिखित आनंद जाधव दिग्दर्शित ‘एव्हरी डे इज संडे’ या एकांकिकांचे प्रयोग मंगळवारी (दि.२१) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सादर करण्यात आले.  सुरुवातीला तो, ती आणि नाटक ही एकांकिका सादर करण्यात आली. या एकांकि केचे कथानक नाटकावरील दिग्दर्शकाचे प्रेम आणि प्रेयसीवर जडलेल्या प्रेमातून साकारलेले नाटक याभोवती फिरत जाते. या प्रयोगातून कलाकार आशिष चंद्रचुड, तिष्या मुनवर, समृध्दी वाघमारे, प्रतीक विसपुते, विश्वंभर परेवाल, प्रसाद काळे यांनी भूमिका साकारल्या.  तसेच ‘एव्हरी डे इज संडे’ या प्रयोगाचे कथानक वैवाहिक आयुष्यात कालांतराने नाते गृहीत धरले जाऊ लागते. आपल्या जीवनात जोडीदाराचे असलेले महत्त्व विसरले जाते जेव्हा हे कळते तेव्हा...? असे या एकांकिकेच्या कथानकाने भावनिकरीत्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवले. यामध्ये कृतार्थ कंसारा, सतीश वराडे, मंजूषा फणसळकर यांनी भूमिका साकारल्या.

टॅग्स :cultureसांस्कृतिक