शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिन्यांमधून वाहते गटार : आजारांना निमंत्रण

By admin | Updated: June 11, 2017 21:35 IST

वडाळावासीयांना ‘काळ्या पाण्या’ची वारंवार शिक्षा

नाशिक : मागील महिन्यात वडाळागावातील तैबानगर परिसरात नळांमधून गटारीचे पाणी येत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर गावातील रझा चौक, झीनतनगर परिसरात नळांना गटारीचे पाणी येत असल्याने रहिवाशांनी महापालिकेच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. तुडुंब भरलेले ड्रेनेज आणि जुनाट जलवाहिन्यांमुळे वडाळावासीयांना वारंवार जणू ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा महापालिकेच्या उदासीनतेमुळे भोगावी लागत आहे.महापालिकेच्या दैनंदिन पाणीपुरवठा योजनेबाबत अनेकदा तक्रारी कानी येत असतात. वडाळागावातील रझा चौक ते थेट रहेमतनगर आणि झीनतनगर, आलिशान सोसायटी, गणेशनगर, जय मल्हार कॉलनी, रामोशीवाडा या सर्व भागातील शेकडो कुटुंबांच्या नळांमधून चक्क सांडपाणी येत आहे. झीनतनगर येथे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यामधील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून गटारीचे काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असल्याचे धक्कादायक चित्र पहावयास मिळाले. सुमारे पंधरवड्यापासून या भागात गढूळ नव्हे तर थेट गटारीचे सांडपाणी नळांना येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दूषित पाणीपुरवठ्यामुळे परिसरातील बहुतांश कुटुंबातील लहान मुलांपासून तर महिलांपर्यंत सर्वांना थंडी-ताप, अतिसार, उलट्या, अंगदुखी यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे.