शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेनेजलाइनवरील चेंबर्स फोडून सांडपाण्याचीही चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:40 IST

महापालिकेने टाकलेल्या ड्रेनेजलाइनवरील चेंबर्स फोडून सांडपाण्याचीही चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, भुयारी गटार विभागाच्या पथकाने म्हसरूळ शिवारात एका शेतकऱ्याकडून मोटार जप्त करण्याची कारवाई केली आहे. ड्रेनेजलाइनवरील चेंबर्समध्ये दगड, वाळूच्या गोण्या, गोधड्या टाकून सांडपाणी अडवण्याचाही प्रकार निदर्शनास आला आहे.

नाशिक : महापालिकेने टाकलेल्या ड्रेनेजलाइनवरील चेंबर्स फोडून सांडपाण्याचीही चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, भुयारी गटार विभागाच्या पथकाने म्हसरूळ शिवारात एका शेतकऱ्याकडून मोटार जप्त करण्याची कारवाई केली आहे. ड्रेनेजलाइनवरील चेंबर्समध्ये दगड, वाळूच्या गोण्या, गोधड्या टाकून सांडपाणी अडवण्याचाही प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे आयुक्तांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.  महापालिकेच्या भुयारी गटार विभागामार्फत नंदिनी तथा नासर्डी, गोदावरी नदीकाठाजवळील ड्रेनेजलाइनमधून जाणारे सांडपाणी बंद करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, काही ठिकाणी औद्योगिक कंपन्यांकडून नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सदरची मोहीम सुरू असतानाच अनेक ठिकाणी चेंबर्स फोडलेले निदर्शनास आले आहेत. सदर चेंबर्स फोडून त्यात मोठ-मोठे दगड, वाळूने भरलेल्या गोण्या, गोधड्या टाकून पाइपलाइनमधील सांडपाणी अडवले जाते. सदर सांडपाण्याला जवळच वाट करून देत पाण्याचे तळे तयार केले जाते.  सदर साचलेल्या पाण्यात पाइप टाकून मोटारीने पाणी खेचत ते जवळच्या शेतीला दिले जाते. शेतक- ºयांबरोबरच काही वाळूमाफियांकडूनही सांडपाणी वळवून त्याचा वापर करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चेंबर्स फोडून सांडपाण्याची तळी साचत असल्याने त्यावर डासांची उत्पत्ती होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होऊ शकतो. म्हसरूळ शिवारात अशाच प्रकारे चेंबर्स फोडून मोटारीने सांडपाणी शेतात पळविले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, महापालिकेच्या पथकाने सदर मोटार जप्त केली असून, शेतकºयाचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सद्यस्थितीत भुयारी गटार विभागाच्या कर्मचाºयांमार्फत फुटलेल्या चेंबर्सची साफसफाई करण्याबरोबरच दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात, कर्मचाºयांना दगडांबरोबरच फ्लेक्स, गोधड्या आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिकेने सदर ठिकाणी गस्तीपथक कार्यरत ठेवण्याचा विचार चालविला आहे.आणखी काही कंपन्यांना नोटिसानासर्डी नदीपात्रात सातपूर औद्योगिक वसाहतीतील काही कारखान्यांमधून रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जात असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार, महापालिकेने संबंधित कारखानदारांवर कारवाई करण्यासाठी एमआयडीसी व महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठविले होते. सातपूर पाठोपाठ अंबड औद्योगिक वसाहतीतीलही काही कंपन्यांकडून नदीपात्रात सांडपाणी सोडले जात असल्याचे आढळून आले आहे. त्याबाबत महापालिकेने गंभीरतेने घेतले असून, संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, विधानसभेतही याप्रश्नी स्थानिक आमदारांनी आवाज उठविलेला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका