इंदिरानगर : पाथर्डी फाटा येथील पोलीस वसाहत ते गामणेमळा रस्त्यावरून भूमिगत गटारीचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी दुतर्फा वाहत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मार्गक्रमण करताना नाक दाबून ये-जा करावी लागत आहे. पोलीस वसाहत ते गामणेमळा रस्त्याच्या दोन्ही बाजूस विविध अपार्टमेंट आणि सोसायटी आहेत. त्यामुळे परिसरात पाच दिवसांपासून भूमिगत गटारीचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी पसरल्याने घराची दारे व खिडक्या उघडणे मुश्कील झाले आहे. तसेच साथीच्या आजाराची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तातडीने रस्त्यावरून वाहणारे भूमिगत गटारीचे पाणी थांबविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
पाथर्डी फाटा रस्त्यावर गटारीचे घाण पाणी
By admin | Updated: May 21, 2016 22:52 IST