शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘पीटीए’च्या मागण्यांना मसुदा समितीची संमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 11:49 IST

राज्य शासनाचा प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी अधिनियम २०१८ कायद्याच्या कच्चा मसुद्यावर खासगी क्लासचालकांची संघटना प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने सुचविलेले सर्व बदल स्वीकारण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रोफेशनल टीर्चस असोसिएशनतर्फे मंगळवारी देण्यात आली.

ठळक मुद्देशिकवणी अधिनियमदीड हजार रुपयांत नोंदणी, तीन वर्षांनी नूतनीकरण

नाशिक : राज्य शासनाचा प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी अधिनियम २०१८ कायद्याच्या कच्चा मसुद्यावर खासगी क्लासचालकांची संघटना प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने सुचविलेले सर्व बदल स्वीकारण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रोफेशनल टीर्चस असोसिएशनतर्फे मंगळवारी देण्यात आली. या प्रस्तावित विधेयकाच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी कोचिंग क्लासेस संघटनेचे सहा प्रतिनिधी व शासन समिती यांच्यात सोमवारी (दि.१५) शिक्षण आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीत मसुदा समितीने महत्त्वपूर्ण विषयात बदल मान्य केल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.राज्यशासनाच्या प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी अधिनियम २०१८च्या कच्चा मसुद्यातील अटी-शर्ती खासगी क्लासेसचालकांना जाचक ठरणाºया असल्याची भूमिका घेत प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनतर्फे आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे शासनाच्या मसुद्यात काही बदलही सुचविण्यात आले होते. हे सर्व बदल शिकवणी विधेयकाच्या मसुदा समितीने स्वीकारल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख लोकेश पारख यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथे सोमवारी शिक्षण आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शासनाच्या मसुदा समिचीने पीटएच्या मागण्या मान्य करीत क्लासची नोंदणी फी दहा हजार ऐवजी ग्र्रामपंचायत स्तरावर पाचशे रुपये, नगरपालिका स्तरावर एक हजार रुपये व मनपा स्तरावर १५०० रुपये करण्यास संमती दर्शविली आहे. त्याचप्रमाणे, शासकीय नियमांचे उल्लंघन केल्यास दोन वर्षे कैद व पाच लाख दंडाऐवजी फक्त द्रव्यदंडाची शिक्षा करण्यात येणार आहे. अधिकृत पार्किंग शब्दाऐवजी सार्वजनिक पार्किंग व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जागांवर पार्किंग अशी सुधारणा करून नवीन कायद्यात तरतूद करण्याचे आश्वासन यावेळी पीटीएला देण्यात आले आहे. तसेच पहिली ते बारावीपर्यंच्या संबंधित कोचिंग क्लासेसचा अंतर्भाव असलेल्या तरतुदीत नव्याने सर्व स्पर्धा परीक्षांसाठीच्या कोचिंग क्लासेसचा अंतर्भाव करण्याची मागणीही मसुदा समितीने मान्य केल्याची माहिती पीटीएतर्फे देण्यात आली आहे.