शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

डॉ. सुभाष भामरे यांचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:24 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांनी ५ लाख ८७ हजार ८६९ मते मिळवून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. तर काँग्रेसचे कुणाल पाटील यांना ३ लाख ६० हजार ६१० मते मिळाली. निवडणुकीत डॉ.सुभाष भामरे यांना २ लाख २७ हजार २५९ एवढे मताधिक्य मिळाले.

धुळे : लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांनी ५ लाख ८७ हजार ८६९ मते मिळवून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. तर काँग्रेसचे कुणाल पाटील यांना ३ लाख ६० हजार ६१० मते मिळाली. निवडणुकीत डॉ.सुभाष भामरे यांना २ लाख २७ हजार २५९ एवढे मताधिक्य मिळाले. डॉ.भामरे यांना २०१४ च्या निवडणुकीत ५ लाख २९ हजार ४५० मते मिळाली होती. म्हणजेच डॉ.भामरे यांनी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ६८ हजार २१९ मते अधिक मिळविली. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघातून डॉ. भामरे यांना मताधिक्य मिळवित सन २०१४ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती घडवली.धुळे : सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे डॉ.सुभाष रामराव भामरे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे कुणाल पाटील यांचा २ लाखांच्या मताधिक्याने पराभव केला. धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची होणार अशी अपेक्षा निकालानंतर फोल ठरली. डॉ. भामरे यांनी पहिल्या फेरीपासूनच लीड घेतला होता तो अंतिम फेरीपर्यंत वाढतच गेला.गुुरुवारी सकाळी ७.३० वाजता उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व मतमोजणी निरीक्षकांच्या उपस्थितीत स्ट्रॉँग रूम उघडून मतमोजणीस प्रारंभ झाला. सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू झाली. एकूण १९ फेºया झाल्या. भाजपचे उमेदवार डॉ.भामरे यांनी केवळ एक फेरी वगळता त्यांनी प्रत्येक फेरीत आपली आघाडी वाढवत नेली. यामुळे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. १९ व्या फेरीअखेर डॉ.भामरे यांचा विजय निश्चित होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष सुरू केला. शहर व जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साह पहावयास मिळाला.शहरातील नगावबारी परिसरातील केंद्रीय विद्यालयाशेजारी असलेल्या शासकीय धान्य गुदामात विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी २० या प्रमाणे १२० टेबल्सवर मतमोजणी प्रक्रिया पार पडली. दुपारी तीन वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण झाली. यानंतर रॅन्डम पद्धतीने केंद्रांची निवड करून तेथील व्हीव्हीपॅट मतांची पडताळणी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने केलेल्या जय्यत तयारीमुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली.वाढलेले तापमान लक्षात घेऊन बंदोबस्तासाठी असलेले पोलीस, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी मंडपांची व्यवस्था केली होती. गुदाम परिसरात पोलिसांच्या वाहनांसह अग्निशमन बंब, १०८ क्रमांकाच्या दोन रुग्णवाहिका, तत्काळ उपचारासाठी आरोग्य विभागाचे पथक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. व्हीव्हीपॅट मत पडताळणीला चार तासांचा कालावधी लागला.या निकालाचा  ऐतिहासिक संदर्भधुळ्याचे विद्यमान खासदार व संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना घरातून राजकीय वारसा लाभला. २०१४ मध्ये डॉ. भामरे यांनी पहिल्यांदा विजय मिळवला. उच्चशिक्षित आणि शांत व सुस्वभावी असलेल्या डॉ.भामरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपविली. ती समर्थपणे सांभाळत त्यांनी मतदारसंघाकडेही लक्ष दिले. त्याचे फळ म्हणून त्यांना सलग दुसरा विजय साकारता आला.कॉँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांचे आजोबा चुडामण आनंदा पाटील धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे तीनवेळा निवडून गेले होते. त्याने पंडित नेहरु यांच्या काळात सर्वात जास्त मताधिक्य मिळविले होते. यंदा त्यांचे नातू व धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे कॉँग्रेसतर्फे उमेदवार होते. कुणाल पाटील यांच्या प्रचारास उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला होता; पण त्यांना विजय मिळवता आला नाही.कुणाल पाटील यांच्या पराभवाची ५ कारणेआघाडीत नेत्यांची संख्या जास्त असली तरी प्रचारात ते फार सक्रिय दिसले नाहीत.विकासाचे मुद्दे प्रखरपणे मांडण्याऐवजी नरेंद्र मोदींवरच टीका करण्यात आली.बेरोजगारी, नोटाबंदीमुळे झालेले नुकसान आदी प्रश्न प्रखरपणे मतदारांसमोर मांडता आले नाहीत.मालेगाव मध्य मतदारसंघातून जे मताधिक्य मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाही.मतदारांमध्ये विशेषत: तरुणांमध्ये मोदींची असलेली क्रेझचाही परिणाम झाला आहे.कारणे विजयाचीभाजपने प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले. प्रत्येक गावापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.नरेंद्र मोदी यांचीसुप्त लाट होती. त्यामुळे मताधिक्य मिळाले.डॉ. सुभाष भामरे यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांना मतदारांनी कौल दिला.काँग्रेसचा उमेदवार मतदारसंघात जनसंपर्कात भाजपच्या तुलनेत नवखा ठरला.काँग्रेसमधील अंतर्गत गट-तटाच्या राजकारणाचाही फटका बसला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालdhule-pcधुळे