शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकरांच्या वस्तूंचे जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:56 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींच्या अनेक पाऊलखुणा नाशिकमध्ये असून, चळवळीतील या आठवणी त्यांच्या अनुयायांनी आजही जपून ठेवल्या आहेत. काळाराम मंदिर सत्याग्रह असो की येवला येथील मुक्तिभूमीवरील धर्मांतराची घोषणा, या ऐतिहासिक घटनांबरोबरच डॉ. आंबेडकरांच्या सान्निध्यातील अनेक आठवणी नाशिकमध्ये आजही जिवंत ठेवल्या आहेत.

नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींच्या अनेक पाऊलखुणा नाशिकमध्ये असून, चळवळीतील या आठवणी त्यांच्या अनुयायांनी आजही जपून ठेवल्या आहेत. काळाराम मंदिर सत्याग्रह असो की येवला येथील मुक्तिभूमीवरील धर्मांतराची घोषणा, या ऐतिहासिक घटनांबरोबरच डॉ. आंबेडकरांच्या सान्निध्यातील अनेक आठवणी नाशिकमध्ये आजही जिवंत ठेवल्या आहेत. असाच एक खजिना नाशिकमध्ये असून, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तू संग्रहित करून ठेवण्यात आल्या आहेत. रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात बाबासाहेबांच्या वस्तूंचे वस्तुसंग्रहालय तयार करण्यात आले आहे. यामध्ये बाबासाहेबांचे पांढऱ्या रंगाचे हाफ पॅन्ट-शर्टचे दोन सूट, चॉकलेटी रंगाचा फूल सूट, दोन हॅट, बूट असे साहित्य जपून ठेवण्यात आले आहे. शाळेच्या आवारात उभारण्यात आलेल्या महाबोधी स्तुपामध्ये डॉ. आंबेडकरांच्या अस्थींचा काही भागदेखील एका चांदीच्या कुपीत ठेवण्यात आला आहे. बाबासाहेबांच्या या वस्तू कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी रमाबाई आंबेडकर शाळेत जतन करण्यासाठी दिल्या होत्या, असे सांगितले जाते. १९४७ मध्ये या वस्तू स्वत: बाबासाहेबांनी दादासाहेब गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केल्या होत्या. तेव्हा त्यांनी या वस्तू रमाबाई आंबेडकर शाळेत दिल्या. या वस्तू आजही शाळेने जतन करून ठेवल्या आहेत. नाशिककरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीमुळे देशभर त्यांच्या आठवणींच्या अनेक पाऊलखुणा आहेत. त्यांचा पदस्पर्श आणि सान्निध्यामुळे अनेक वास्तू आणि वस्तूंना महत्त्व प्राप्त झालेले आहे. नाशिकमधील काळाराम मंदिर सत्याग्रह, येवला येथील मुक्तिभूमीवरील ऐतिहासिक भाषण असो की नाशिक न्यायालयातील त्यांची उपस्थिती याबाबत नाशिककर आवर्जून आठवण काढतात. अनेकांच्या घरी बाबासाहेब आल्याच्यादेखील आठवणी आहेत. मोठा राजवाडा, इंडिया सिक्युरिटी प्रेस विश्रामगृह, नाशिकरोड बुद्धविहार, पाथर्डी, देवळाली कॅम्प आदी अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे पदस्पर्श लागले आहेत.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती