शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

घरबसल्या डाऊनलोड केले २१ लाख सातबारा उतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:56 IST

नाशिक: जमिनीसंदर्भातील व्यवहरासाठी लागणारे डिजिटलाईजड‌् स्वाक्षरीचे सातबारा उतारे ई-गर्व्हनन्सच्याच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याने नाशिक जिल्ह्यात २१ लाख २२ हजार १५५ सातबारा उतारे नागरिकांनी डाऊनलोड करून मिळविले आहेत. या सुविधेमुळे शासकीय यंत्रणेवरील ताण आणि नागरिकांचा वेळ देखील वाचला आहे.

ठळक मुद्देई-गर्व्हनन्सॅ : संगणकीय यंत्रणेचा नागरिकांनी घेतला लाभ

नाशिक: जमिनीसंदर्भातील व्यवहरासाठी लागणारे डिजिटलाईजड‌् स्वाक्षरीचे सातबारा उतारे ई-गर्व्हनन्सच्याच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याने नाशिक जिल्ह्यात २१ लाख २२ हजार १५५ सातबारा उतारे नागरिकांनी डाऊनलोड करून मिळविले आहेत. या सुविधेमुळे शासकीय यंत्रणेवरील ताण आणि नागरिकांचा वेळ देखील वाचला आहे.सातबारा उतऱ्यातील त्रुटी दूर करून नागरिकांना जमिनीचे डिजिटल स्वाक्षरीचे उतारे उपलब्ध करून देण्याची मोहिम राज्यशासनाने राबविली आहे. त्यानुसार जिल्ह्यात उताऱ्याचे संगणकीकरण करण्यात आले असून त्रुटींची देखील दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना जूने अभिलेख आता संगणकीकृत उपलब्ध असल्याने जमिनीची माहिती मिळविणे सोपे झाले आहे. ई-गर्व्हनन्सच्याच्या माध्यमातून जमिनीचे सातबारा उतारे, आठ-अ तसेच फेरफार नोंदीची माहिती घरबसल्या उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात २१ लाख २२ हजार १५५ सातबारा उतारे नागरिकांनी डाऊनलोड करून घेतले आहेत. त्याचप्रमाणे ९ लाख तीन हजार ६०४ आठ अ चे उतारे तर ३ लाख ९ हजार ५०७ फेरफार नोंदीचे उतारे नागरिकांना डाऊनलोड करून मिळविले आहेत. जिल्ह्यात या प्रकारे एकुण ३३ लाख ३५ हजार २६६ इतके उतारे नागरिकांनी घरबसल्या मिळविले आहेत. या संख्येवरून जिल्ह्यात ऑनलाईनच्या माध्यमातून उतारे मिळविण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे यावरून दिसत आहे.जमिनीसंदर्भातील माहिती खासगी तसेच शासकीय कामासाठी अनेकदा महत्वाची ठरत असते. जमिनीच्या मुळ मालकापासून तर त्यात वेळोवेळी होत गेलेल्या बदलांंच्या नोंदी ऑनलाईन सहज उपलब्ध होत असून त्यासाठी आता तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत. जमिनीचे सातबार, फेरफार,खाते उतारे यांची माहिती भूमी अभिलेख आणि तहसील कार्यालयात उपलब्ध‌् होती ती आता ऑनलाईन उपलब्ध झाल्याने यंत्रणेवरील ताण देखील कमी झाला आहे.जिल्ह्यात लाखो उतारे ऑनलाईन वितरीत झाले आहेत. संबंधितांनी ऑनलाईच्या माध्यमातून उतारे प्राप्त करवून घेत आहेत.जमिन खरेदी,विक्रीच्या व्यवहारासाठी उतारे महत्वाचे असल्याने दररोज हजारो लोक ऑनलाईन माध्यमाला भेट देत असतात तर प्रत्यक्षात उतारे काढणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.२३११ उताऱ्यांची लवकरच दुरूस्तीजिल्ह्यात सातबारा उताऱ्यातील दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्यानंतर १२,५०,९४८ इतके उताऱ्यांची दुरूस्ती करण्यात आलेली आहे. आता केवळ २३११ इतकेच उतारे दुरूस्त करणे राहिले असून त्यातील त्रुटी दूर झाल्यानंतर संपुर्ण डिजिटलायझेन होण्याचा मान जिल्ह्याला मिळणार आहे. उताऱ्यांमधील दुरूस्तीमुळे मालमत्ताधारकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.--इन्फो--नागरिकांसाठी दस्तऐवज वितरणतालुका सातबारा आठ अ फेरफार एकुणनाशिक २८६७८६ ३१२८५ ९६७२७ ४१४७९८सुरगाणा ४६२१२ ३७८८२ १३७८ ८५४७२त्र्यंबक ५१०३१ १४८६४ ६८७४ ७२७६९इगतपुरी ३७२५७ ७२९३ १६६६२ ६१२१२सिन्नर २३५१०८ १०२६१९ ३०१५३ ३६७८८०निफाड २१३९८७ ८३०७५ ३१४४८ ३२८५१०येवला ९३३३० ९३०५६ १०६६९ १५७०५५कळवण ५६२६६ ३१७४१ ९३५१ ९७३५८देवळा ११९६६७ ४२५१४ ६०८५ १६८२६६बागलाण १८१०२४ ९३०८४ १२३९८ २८६५०६मालेगाव ३२३२०० १५८२७८ ३१११२ ५१२५९०नांदगाव ५३९३६ ३१९७२ १२५५१ ९८४५९चांदवड १७१०८८ ७४५२६ १८२३८ २६३८५२दिंडोरी २०००६९ ९६५३६ २३८९५ ३२०५००पेठ ५३१९४ ४४८७९ १९६६ १०००३९एकुण २१२२१५५ ९०३६०४ ३०९५०७ ३३३५२६६

टॅग्स :GovernmentसरकारRural Developmentग्रामीण विकास