शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सदगुरुंच्या नामाचा विसर पडू देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:51 IST

ओझर : सदगुरूंच्या कामाचा कधीही विसर पडू देऊ नका. सदगुरुंच्या नामात प्रचंड सामर्थ्य आहे ते ओळखा आणि ओम जनार्दनाय ...

ठळक मुद्देशांतिगिरी महाराज : जनार्दन स्वामी महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा

ओझर : सदगुरूंच्या कामाचा कधीही विसर पडू देऊ नका. सदगुरुंच्या नामात प्रचंड सामर्थ्य आहे ते ओळखा आणि ओम जनार्दनाय नमः या महामंत्राचा सतत जप करा आणि आपले जीवन सार्थक करा. मौनव्रत असल्याने असे लेखी प्रतिपादन निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा साजरा होत असतो. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे आश्रमात जास्त गर्दी न करता काही मोजक्याच साधकांच्या उपस्थितीत पुण्यस्मरण सोहळा होत आहे. याप्रसंगी कोरोना महामारी संपुष्टात येण्यासाठी सामूहिक प्रार्थना केली जात आहे. रोज पहाटे ५ वाजता ब्रम्हमुहूर्तावर नित्यनियम विधी, प्राणायाम, ध्यान, भागवत वाचन, महाआरती, सत्संग संपन्न होत आहे.देशभरातील भविकांना ऑनलाईन पद्धतीने सोहळ्याचा लाभ घेता येत आहे. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महायज्ञ, जपानुष्ठान, अखंड नंदादीप, नामसंकीर्तन यांसह विविध आध्यात्मिक साधना कोरोना महामारीच्या समूळ उच्चाटनासाठी सुरू आहे. यावेळी स्वामीजींचे मौनव्रत असल्याने लेखी संदेश त्यांनी दिला. 

टॅग्स :OzarओझरSocialसामाजिक