शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कमी टक्क्यांत कर्जाचा मेसेज आला तर ॲप डाऊनलोड करू नका...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST

कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले, तर बहुतांश नोकरदारवर्गाला वेतनकपातीचा सामना करावा लागत आहे. तसेच व्यावसायिकवर्गाचे लॉकडाऊन, निर्बंधांमुळे हाल होत ...

कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले, तर बहुतांश नोकरदारवर्गाला वेतनकपातीचा सामना करावा लागत आहे. तसेच व्यावसायिकवर्गाचे लॉकडाऊन, निर्बंधांमुळे हाल होत आहेत. त्यांच्याही व्यवसायावर परिणाम झाला आहे. यामुळे कर्जाचे आमिष दाखवून त्याचा गैरफायदा घेत फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचेही फावले आहे. अत्यंत कमी टक्क्यांत सहजरित्या कर्ज उपलब्ध असल्याचे भासवून विविध ॲप्लिकेशनच्या लिंक पाठवून ते ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती या ॲप्लिकेशनच्या दिलेल्या लिंकवर क्लिक करते तेव्हा त्याच्या आर्थिक फसवणुकीचा मार्ग मोकळा होतो. कर्जसहाय्य करणाऱ्या विविध नामांकित कंपन्यांच्या नावानेसुध्दा गुगल - प्ले - स्टोअरवर बनावट ॲप्स उपलब्ध आहेत. यामुळे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यापूर्वी खात्री करणे गरजेचे आहे.

--इन्फो--

ॲप डाऊनलोड करताच खात्यातील रक्कम गायब

१) समोरच्या व्यक्तीकडून मेसेज पाठवून मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे अशा फसव्या लिंकपासूनदेखील सावध होणे गरजेचे आहे. जेव्हा लिंकवर क्लिक केले जाते तेव्हा त्या सायबर गुन्हेगाराला वैयक्तिक माहितीचा डेटा हॅक करण्याची संधी मिळते. काही समजण्याआधीच हॅकर्सकडून बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारला जातो.

२) हॅकर्सला केवळ गोपनीय माहिती जाणून घ्यावयची असते. आजकाल तर आधारकार्ड क्रमांकदेखील बँक खात्याशी जोडलेला असतो. त्यामुळे हॅकर्सला फारसे अवघड होत नाही. एकदा का ॲप डाऊनलोड करण्याच्या लिंकवर क्लिक केले, की आपोआप हॅकर्सला आपण आपल्या बँक खात्याची माहिती चोरण्यासाठी जणू निमंत्रणच दिले असे समजावे.

---इन्फो---

या आमिषांपासून सावधान

वैयक्तिक कर्जाची रक्कम अवघ्या काही तासांत तुमच्या खात्यात मिळवा

वैयक्तिक कर्जापोटी आकारल्या जाणाऱ्या व्याजदराची टक्केवारी अत्यंत कमी

वैयक्तिक कर्जासाठी लागणारे प्रोसेसिंग शुल्क न भरता मिळवा कर्जाची पूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यात.

कुठलेही कागदपत्रे न देता तत्काळ कर्ज मंजूर करून घ्या आणि हप्ते फेडण्याच्या सुलभ प्रक्रियेचा लाभ मिळवा.

---इन्फो--

सावधान....! तुमचीही होऊ शकते अशीच फसवणूक

अलीकडेच आर्टीलरी सेंटरमधील एका जवानाला आर्थिकदृष्ट्या पैशांची गरज भासली असता त्या जवानाने कमी व्याजदरात अधिक कर्ज देणाऱ्या मेसेजला व भ्रमणध्वनी कॉल आणि व्हॉट्सॲपवरील संवादाला भुलून अनोळखी व्यक्तीवर विश्वास दाखविला असता सुमारे दीड लाखांच्या फसवणुकीचा सामना त्याला करावा लागला. सायबर चोरट्यांनी यासाठी कर्जसहाय्य करणाऱ्या नामांकित फायनान्स कंपनीच्या नावाचा वापर केला. त्या जवानाची वेगवेगळ्या प्रकारे दिशाभूल करत वेळोवेळी ऑनलाईन डिजिटल बँकिंग ॲपद्वारे पैसे उकळले.

--इन्फो--

...ही घ्या काळजी :

१) कर्जसहाय्य देण्याचा आलेला मेसेज अथवा व्हॅल्युबल कस्टमर म्हणून मंजुळ आवाजात संपर्क साधणाऱ्या सायबर चोरट्यांपासून सावध रहा.

२) कमी टक्क्यांत एक लाख किंवा दोन लाखांपर्यंत कर्ज मंजूर करून देत असल्याचे कॉल आल्यास त्यांना प्रतिसाद देऊ नका किंवा त्यांच्याशी आपल्या मातृभाषेतच संवाद साधा, त्यांची जी भाषा असेल त्या भाषेत बोलू नका.

३) मोबाईलवर आलेल्या मेसेजमधील किंवा ई-मेलद्वार प्राप्त झालेल्या अशा कुठल्याही ॲप्लिकेशनच्या लिंकवर थेट क्लिक करू नका, ॲप्लिकेशन डाऊनलोड करताना सरसकट मोबाईल गॅलरी, व्हिडिओ, ऑडियो, कॅमेरा अशा सर्व परवानग्या स्वत:हून ‘ओके’ करू नका.

250721\25nsk_8_25072021_13.jpg

कर्ज घ्या