शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गॅसच्या दरात ९४ रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:17 IST

नाशिक : केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली असून, गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी दरवाढ आहे. या दरवाढीची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आल्याने आता सिलिंडरसाठी ग्राहकांना ७३९ रुपये मोजावे लागतील. याबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये तब्बल २२० रुपयांची वाढ झाल्याने त्याचा परिणाम सर्वच खाद्यपदार्थ विक्रीच्या दरवाढीत होणार आहे.

 

महागाईचा चटका : व्यावसायिक २२० रुपये

नाशिक : केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली असून, गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी दरवाढ आहे. या दरवाढीची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आल्याने आता सिलिंडरसाठी ग्राहकांना ७३९ रुपये मोजावे लागतील. याबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये तब्बल २२० रुपयांची वाढ झाल्याने त्याचा परिणाम सर्वच खाद्यपदार्थ विक्रीच्या दरवाढीत होणार आहे.तेल कंपन्यांना सरकारच्या नियंत्रणातून मुक्त केल्यानंतर केंद्र सरकारची पावले गॅसच्या बाबतीतही त्याच मार्गाने पडू लागली असून, घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर सरकार ग्राहकांना अनुदान देत असले तरी, वर्षाकाठी अनुदानित सिलिंडर वापराची मर्यादा बारा इतकीच ठेवण्यात आली आहे. महिन्याकाठी दोन सिलिंडर वापरणारीही कुटुंबे असल्याने त्यांना आता वाढीव दराने म्हणजेच खुल्या बाजारातील दराने सिलिंडर खरेदी करावे लागणार आहे.गेल्या तीन महिन्यांत सातत्याने ही वाढ झाली असून, घरगुती वापराच्या १४ किलो वजनाच्या सिलिंडरची किंमत सप्टेंबर महिन्यात ५९६ रुपये तर आॅक्टोबर महिन्यात त्यात वाढ होऊन ६४५ रुपये इतकी झाली. नोव्हेंबर महिन्यात हेच दर आता ७३८ रुपये ५० पैसे इतके झाले आहेत.त्यामुळे घरपोच गॅस सिलिंडर देणाºया कर्मचाºयाला आता ७५० रुपये देण्यावाचून ग्राहकांना पर्यायच राहिलेला नाही. अशाच प्रकारे व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरातही दर महिन्याला वाढ होत असून, १९ किलो वजनाच्या या गॅस सिलिंडरसाठी सप्टेंबरमध्ये १०८१ रुपये, आॅक्टोबर महिन्यात ११५८ रुपये व नोव्हेंबर महिन्यात १३०४ रुपये ५० पैसे इतके झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडरचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे, चहा टपरी, खानावळ चालकांकडूनच अधिक वापर केला जातो. आता थेट एका सिलिंडरमागे २२० रुपयांची वाढ झाल्यामुळे साहजिकच खाद्यपदार्थांच्या दरातही वाढ करण्याशिवाय व्यावसायिकांना पर्याय राहिलेला नाही. व्यावसायिक दर महागले व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरातही दर महिन्याला वाढ होत असून, १९ किलो वजनाच्या या गॅस सिलिंडरसाठी सप्टेंबरमध्ये १०८१ रुपये, आॅक्टोबर महिन्यात ११५८ रुपये व नोव्हेंबर महिन्यात १३०४ रुपये ५० पैसे इतके झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडरचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे, चहा टपरी, खानावळ चालकांकडूनच अधिक वापर केला जातो.