शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कागदोपत्री बीएलओ दाखवून मानधन लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 15:28 IST

मतदार यादी व निवडणूक आयोगाच्या विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदान केंद्र निहाय नेमलेल्या बीएलओंच्या नेमणूका व मानधन वाटपात लाखो रूपयांचा घोटाळा झाल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणताच त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या संदर्भात जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघात नेमलेल्या सर्व बीएलओंची खात्री करण्यासाठी लवकरच त्या त्या मतदार संघात बैठक घेण्याचा विचार सुरू झाला आहे.

ठळक मुद्देमित्र, मैत्रिणींनाही लाभ : अधिका-यंचे दुर्लक्ष कारणीभूत

नाशिक : निवडणूक आयोगाच्या कामासाठी बीएलओंची नेमणूक करण्याची तरतूद असली तरी, निवडणुकीच्या कामाकडे ‘नॉन प्रॉडक्टीव्ह वर्क’ म्हणून पाहण्याची महसूल अधिकाऱ्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत मालेगावच्या निवडणूक कर्मचा-याने चक्क आपल्या मित्र, मैत्रिणींना व पत्नीला बीएलओ (ब्लॉक लेव्हल आॅफिसर) म्हणून कागदोपत्री दाखवून त्यांच्या नावे दरवर्षी बॅँकेत जमा होणा-या रकमेचा अपहार केला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षापासून हा सारा प्रकार सुरू असताना तहसिलदार वा निवडणूक नायब तहसिलदारांनी त्याकडे सोयीस्कर भुमिका घेतल्याचेही बोलले जात आहे.मतदार यादी व निवडणूक आयोगाच्या विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदान केंद्र निहाय नेमलेल्या बीएलओंच्या नेमणूका व मानधन वाटपात लाखो रूपयांचा घोटाळा झाल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणताच त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या संदर्भात जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघात नेमलेल्या सर्व बीएलओंची खात्री करण्यासाठी लवकरच त्या त्या मतदार संघात बैठक घेण्याचा विचार सुरू झाला आहे. विशेष करून मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या दोन मतदार संघाबरोबरच नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदार संघातील बीएलओंच्या नेमणूकीबाबत प्रशासन साशंक आहे. प्रत्येक मतदार संघनिहाय बीएलओंची नेमणूक करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून त्यांच्या नावे निवडणूक आयोगाकडून मिळणारे मानधनाची लाखो रूपयांची रक्कम खर्ची दाखविली जात असून, प्रत्यक्षात बीएलओंचे कामकाज मात्र दिसून येत नाही. त्यामुळे काम न करता बीएलओंना मानधनाची रक्कम कशाच्या आधारे अदा केली जाते असा प्रश्नही उपस्थित केला जात असून, एकतर बीएलओंची नेमणूक न करताच त्यांच्या नावे रक्कम काढली जात असावी किंवा काम न करताच बीएलओंना मानधन अदा केले जात असावे या दोहोंपैकी एक काही तरी खरे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मालेगाव येथील निवडणूक कर्मचारी सोनवणे याने तर बीएलओंच्या मानधनाची रक्कम आपली पत्नी, मैत्रिण, मित्र व त्याच्या मैत्रिणीच्या नावे बॅँकेत जमा करून हजारो रूपये हडप केल्याचे उघडकीस आले आहे. याचाच अर्थ बीएलओंची नेमणूक न करताच कागदोपत्री तसे दाखविण्यात आले आहे. सदरची बाब उघडकीस येवून बराच महिन्यांचा कालावधी लोटला परंतु त्याविरूद्ध फौजदारी कारवाई करण्यास अधिका-यांकडून प्रारंभी टाळाटाळ करण्यात आली त्यानंतर मात्र स्वत:वर बालंट येण्याची शक्यता पाहून तक्रार देण्यात आली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक