शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

साहित्यातून माणूसपणाची शिकवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 18:14 IST

रविंद्र मालुंजकर : ग्रामीण साहित्य संमेलनात प्रतिपादन

ठळक मुद्देग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन कवी प्रकाश होळकर यांच्या हस्ते झाले.

वाडिव-हे : ग्रामीण भागातून आजही भावगीते, जात्यावरील ओव्या, भावगीते यातून अस्सल ग्रामिण संस्कृती जिवंत आहे. शेतातील पिकांची राखणी, लग्नातील गीते अथवा शेतकऱ्यांच्या समस्या त्यातून नेहमीच साहित्यिकांना प्रेरणा मिळत आली आहे . या साहित्यातूनच माणूस म्हणून जगण्याची शिकवण मिळते, असे प्रतिपादन कवी रविंद्र मालुंजकर यांनी इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित विसाव्या ग्रामीण साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरु न बोलतांना केले.ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन कवी प्रकाश होळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कवि किशोर पाठक, प्रा.राज शेळके, मविप्रचे संचालक भाऊसाहेब खातळे, कवि विवेक उगलमुगले,मंडळाचे अध्यक्ष व साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, जेष्ठ साहित्यिक रामदास वाघ, सौ.सुरेखा बोराडे, प्रा.गिरी, स्वागताध्यक्ष रावसाहेब कातोरे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पुंजाजी मालुंजकर यांच्या ‘कोणासाठी’ या कादंबरीचे प्रकाशन मान्यवारांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर ‘वाचन हेच जीवन विकासाचे साधन’या विषयवार जेष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. त्यात पूंजाजी मालुंजकर, विवेक उगलमुगले,प्रा.राज शेळके,व सुरेखा बोराडे यांनी सहभाग घेतला. तसेच विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. चित्रांगण क्लासेसच्या विद्यार्थ्यांचेही चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रास्ताविक बाळासाहेब पलटने यांनी तर सूत्रसंचालन अ‍ॅड ज्ञानेश्वर गुळवे यांनी केले. प्रारंभी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कथाकथन, कविसंमेलनद्वितीय सत्रात कथाकथन झाले. कविसंमेलनात सुमारे ५० कवींनी आपल्या रचना सादर केल्या. यावेळी विजयकुमार मीठे,सावळीराम तिदमे,विलास पगार,गौरवकुमार आठवले,राजेन्द्र उगले,डॉ. भास्कर म्हारसाळे,प्रा.संजय जाधव,जासवंदी मोजाड,संजय कान्हव,रविन्द्र पाटिल,अलका कोठवदे,विद्या पाटिल, के.टी.राजोळे, शरद मालुंजकर,अभिमन सोनवणे,सुदर्शन पाटील,रविन्द्र पाटील,अंकुश क्षीरसागर,श्रीयश मालुंजकर, विशाल मुसळे,शरद भोर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक