नॉन कोविड रुग्णांसाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 01:43 AM2020-05-03T01:43:45+5:302020-05-03T01:44:00+5:30

मालेगाव : नॉन कोविड रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ या संकल्पनेतून मालेगावकराच्या सेवेत एकाचवेळी अकरा मोबाइल व्हॅन दाखल झाल्या आहेत.

‘Doctor at your door’ initiative for non-covid patients | नॉन कोविड रुग्णांसाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रम

नॉन कोविड रुग्णांसाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रम

Next

मालेगाव : नॉन कोविड रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ या संकल्पनेतून मालेगावकराच्या सेवेत एकाचवेळी अकरा मोबाइल व्हॅन दाखल झाल्या आहेत. या व्हॅनच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात जाऊन तेथील रु ग्णांची त्याच ठिकाणी मोफत तपासणी व औषधोपचार करणार आहेत. या तपासणी मोहिमेत सारी व कोरोनासदृश आजाराची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर प्रथमोपचार करून त्यांना शासकीय
रु ग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याने, या अकरा मोबाइल व्हॅन कोरोनामुक्त मालेगाव करण्यात नक्कीच खारीचा वाटा उचलतील, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.
भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स, महाराष्ट्र शासन, महानगरपालिका व सर्व डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विश्रामगृह, मालेगाव येथे ‘डॉक्टर आपल्या दारी’ या मोहिमेचा शुभारंभ भुसे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर ताहेरा शेख, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ. पंकज आशिया, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंंह, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, महानगरपालिकेचे आयुक्त दीपक कासार, उपस्थित होते. यावेळी भुसे म्हणाले, मोबाइल व्हॅनची गरज ओळखून जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून ही सेवा मालेगावकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.
प्रत्येक व्हॅनचे रिपोर्टिंग होणार असल्याने कोणकोणत्या भागात व किती रुग्णांवर उपचार करण्यात आले, याचा अहवालही मिळणार आहे. सेवेत दाखल होणाºया मोबाइल व्हॅनमुळे कोरोना आणि नॉन कोरोना रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी या व्हॅन्सचा नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त माने यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: ‘Doctor at your door’ initiative for non-covid patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :docterडॉक्टर