शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर देता का कोणी डॉक्टर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:55 IST

ऐन रोगराईचा काळ आणि महापालिका रुग्णालयांच्या दुरवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण झाली आहे. महापालिकेने यापूर्वी २८ डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात काढली

नाशिक : ऐन रोगराईचा काळ आणि महापालिका रुग्णालयांच्या दुरवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण झाली आहे. महापालिकेने यापूर्वी २८ डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात काढली, मुलाखती घेतल्या, परंतु जेमतेम आठच डॉक्टर रुजू झाल्याने पुन्हा भरतीसाठी प्रक्रिया राबविण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे.  सामान्यत: ग्रामीण भागात वैद्यकीय व्यावसायिक पुरेशा प्रमाणात नसतात. वैद्यकीय शाखेचे पदवी शिक्षण घेतानाच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये काम करण्याचे बंधपत्र घेण्याचा शासकीय नियम आहे. परंतु बंधपत्राच्या नियमानुसार प्रशिक्षणार्थी डॉक्टर रक्कम भरण्यास तयार होतात, मात्र ग्रामीण भागात जात नाही. परंतु आता नाशिक शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांविषयीदेखील अशीच अवस्था झाली आहे. महापालिकेने मानधन किंवा करारपद्धतीने डॉक्टरांची भरती करण्याची तयारी दर्शवूनदेखील प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.  गेल्या महिन्यात महापालिकेने डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यासाठी २८ जागांसाठी अर्ज मागविले होते. त्यानुसार इच्छुकांनी अर्जदेखील केले, परंतु निवड झालेल्यांपैकी अवघे ८ डॉक्टरच रुजू झाले. निवड होऊनही उर्वरित डॉक्टर रुजू झाले नाहीत. त्यामुळे आता महापालिकेने पुन्हा एकदा भरतीसाठी जाहिरात काढली आहे. सध्या स्वाइन फ्लू, डेंग्यूच्या साथीचा कहर सुरू आहे. स्वाइन फ्लूमुळे ६०च्या घरात मृत्यू पावलेल्यांची संख्या आहे तर डेंग्यूमुळे दोन जण दगावले आहेत. दोन हजार संशयित डेंग्यू रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी साडेसहाशे जणांना डेंग्यू झाला आहे. अशा स्थितीत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अवस्था बिकट झाली आहे. पुरेसे डॉक्टर नाहीत. जे आॅनकॉल आहेत ते वेळेवर येत नाहीत. अशा स्थितीत महापालिकेतील लोकप्रतिनिधीच रुग्णालयांची दुरवस्था चव्हाट्यावर आणत आहेत. परंतु त्यात सुधारणा करण्यासाठी जाहिराती देऊनही डॉक्टर येण्यास तयार नसल्याने अडचण होत आहे.रुग्णालय कसे चालविणार?महापालिकेच्या वतीने पंधरा ठिकाणी बंद पडलेले शहरी आरोग्य केंद्र सुरू करण्याचे आवाहन आहे शिवाय सातपूर येथे नवीन रुग्णालयदेखील बांधण्याचे नियोजन आहे. अशास्थितीत सध्याच्याच रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध होत नसताना नव्याने कोठून आणणार, असा प्रश्न आता केला जात आहे.महापालिकेने यापूर्वी २८ डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात काढली, मुलाखती घेतल्या, परंतु जेमतेम आठच डॉक्टर रुजू झाल्याने पुन्हा भरतीसाठी प्रक्रिया राबविण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे.महापालिकेने डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यासाठी २८ जागांसाठी अर्ज मागविले होते. त्यानुसार इच्छुकांनी अर्जदेखील केले, परंतु निवड झालेल्यांपैकी अवघे ८ डॉक्टरच रुजू झाले.डॉक्टरांची टाळाटाळमहापालिकेतील राजकारण, प्रशासनाकडून असणारा अति दबाव तसेच प्रस्थापित डॉक्टरांमधील वर्चस्ववादाची स्पर्धा अशा अनेक कारणांमुळे महापालिकेच्या सेवेत येण्यास डॉक्टर तयार नसल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर