शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

नाशिककरांवर पुन्हा करवाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:45 IST

नाशिक महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, तसे पाहिले तर नाशिक शहर झपाट्याने वाढले शहराचा विकास होत असला तरी, शहरात त्यामानाने औद्योगिक क्षेत्र विकसित होताना दिसत नाही.

नाशिक महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, तसे पाहिले तर नाशिक शहर झपाट्याने वाढले शहराचा विकास होत असला तरी, शहरात त्यामानाने औद्योगिक क्षेत्र विकसित होताना दिसत नाही. उद्योगधंदे शहराच्या व राज्याबाहेर जाताना दिसत आहेत. मग रोजगारच नसेल तर मनपाची बससेवा कशी चालणार? हा प्रश्न आहे. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली या महानगरपालिकांची बससेवा धापा टाकीत आहे. अशावेळी नाशिक महापालिका असा प्रयोग का करीत आहे, हे कळू शकले नाही. शहरात महापालिकेच्या निर्मितीपासून आजपर्यंत ५५ ते ६० अधिकृत रिक्षा थांबे सोडले तर रिक्षांना पुरेसे थांबे महापालिका देऊ शकलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून रिक्षा थांब्यासाठी ४५० ते ५०० थांब्यांची मागणी करून मिळत नाही तेथे शहर बससाठी ३५० थांबे नव्याने महापालिका कोठे व कशी तयार करणार? शहर व परिसरात बससेवा सुरळीत चालू असताना अचानक बस सामग्री खरेदीचा घाट कशासाठी केला जातो? याचाच अर्थ नाशिककरांवर मोठा करांचा बोजा टाकण्याचे षडयंत्र आखले जात असून, काही दिवसांपूर्वीच विविध करांची वाढ करण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने केंद्र व राज्य सरकार दर बारा वर्षांनी नाशिक महापालिकेला शहरवासीयांच्या सोयी, सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देत असल्यामुळे काही प्रमाणात विकास पहावयास मिळत आहे, अन्यथा मनपाला मिळणारे उत्पन्न, होणारा प्रशासकीय खर्च पाहता महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. बससेवा देण्याच्या नावाखाली करांच्या ओझ्याखाली गाडण्याचे काम मनपाच्या माध्यमातून ‘तुकाराम मुंढे’ अस्त्र वापरून दत्तक घेतलेल्या नाशिककरांना कर्जात ठेवण्याचे काम मुख्यमंत्र्यांकडून सुरू करण्यात आले आहे.- शिवाजी भोर, प्रदेश उपाध्यक्ष, शिववाहतूक सेना

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका