शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरीत बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 15:20 IST

सायखेडा : नाशिक ते औरंगाबाद महामार्गावर चांदोरी - सायखेडा चौफुली येथे कोणतीही बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी ...

सायखेडा : नाशिक ते औरंगाबाद महामार्गावर चांदोरी - सायखेडा चौफुली येथे कोणतीही बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी अचानक रास्ता रोको केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.चांदोरी परिसरातून नाशिक,ओढा येथे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. गोदाकाठ परिसरात महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सायखेडा येथे विद्यार्थी येतात. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रवास करतात. सकाळी विद्यार्थी येतात आणि दुपारनंतर पुन्हा घरी जातात, त्यामुळे या रस्त्याने धावणाऱ्या बसेस या विद्यार्थ्यांसाठी थांबल्या पाहिजे असे मुलांना वाटते मात्र बस वाहक आणि चालक आपल्या निश्चित केलेल्या ठिकाणी थांबतात. तर कधीकधी प्रवाशांनी गाडी पूर्ण भरली असेल तर थांबतही नाही. त्यामुळे वेळेवर शाळेत, कॉलेजमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होते. बस अभावी मुले पोहचतात दोन तास उशिरा तर परतीच्या प्रवासात तासंतास उभे राहूनही बस थांबत नसल्याने घरी उशिरा पोहचतात. त्यामुळे कुटुंबाच्या रोषाला सामोरे जावे लागते. म्हणून सायखेडा त्रिफुली, नागपूर फाटा, शिंपी टाकळी, चितेगाव फाटा, गोंडेगाव फाटा या ठिकाणी बस थांबली पाहिजे अशी मागणी अनेक दिवसांची आहे मात्र परिवहन महामंडळ यावर कोणतीही भूमिका घेत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अचानक रास्ता रोको केला. जवळपास अर्धा तास चालले आंदोलन आक्र मक पवित्रा घेताच सायखेडा पोलीस उपनिरीक्षक सोनवणे आणि माजी सरपंच संदीप टर्ले, संदीप गडाख, गणेश वाणी घटनास्थळी दाखल झाल्याने बस थांबण्यासाठी आगार प्रमुखांना निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक