शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

जीवनात अध्यात्म, पैसा यांची सांगड घालू नका : राहुल फाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:02 IST

आध्यात्मिक कार्य करताना कोणत्याही परिस्थितीत पैसा येता कामा नये, असा सल्ला आपल्याला आपल्या गुरूंकडून मिळाला असल्याचे सांगताना अध्यात्माचा विचार पुढे नेताना जीवनात अध्यात्म आणि पैसा यांची कधीही सांगड घालू नये, असे प्रतिपादन शास्त्रशुद्ध भक्तिमार्गाचे प्रचार व प्रसारक राहुल फाटे यांनी केले.

नाशिक : आध्यात्मिक कार्य करताना कोणत्याही परिस्थितीत पैसा येता कामा नये, असा सल्ला आपल्याला आपल्या गुरूंकडून मिळाला असल्याचे सांगताना अध्यात्माचा विचार पुढे नेताना जीवनात अध्यात्म आणि पैसा यांची कधीही सांगड घालू नये, असे प्रतिपादन शास्त्रशुद्ध भक्तिमार्गाचे प्रचार व प्रसारक राहुल फाटे यांनी केले.शंकराचार्य न्यायासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहाच शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे शुक्रवारी (दि.२२) स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याप्रसंगी राहुल फाटे यांना शास्त्रशुद्ध भक्तिमार्गाचे प्रचार व प्रसारासाठी पुण्यश्लोक सदगुरू शिवपार्वती आध्यात्मिक पुरस्काराने गौरविण्यात आले, तर पुणे येथील भाऊ आठल्ये यांना श्रीराम पराडकर वैदिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गाणगापूरचे वेदमूर्ती प्रदीपभट पुजारी यांना नंदलाल जोशी वेदवेदांग पुरस्कार देण्यात आला तर नाशिकच्या मृणालिनी फाटे यांना डॉ. मो. स. तथा आप्पासाहेब गोसावी लोकसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना राहुल फाटे यांनी जीवनातील चक्रांचे महत्त्व विशद केले. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना डॉ. मो. स. गोसावी यांनी एकविसावे शतक ज्ञानाचे असून, भावीपिढीने आद्यशंकराचार्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्ञानसाधना करण्याची गरज व्यक्त केली. दरम्यान, प्रतिष्ठानतर्फे ‘शिवज्योती’ विशेषांकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मीकांत जोशी यांनी केले. प्रा. के. आर. शिंपी यांनी आभार मानले.अनुबंधी दाम्पत्यांचा गौरव शिवपार्वती प्रतिष्ठान तर्फे डॉ. मो. स. गोसावी व सुनंदाताई गोसावी यांच्यासह डॉ. अनिता व डॉ. शरद पाटील, डॉ. मनीषा व डॉ. प्रभाकर राणे, शोभा व सुरेश जोशी, शोभा व सीए एस. व्ही. गिंडे, चारुशीला व अ‍ॅड. एम. वाय. काळे या अनुबंधी दाम्पत्यांचाही गौरव करण्यात आला.आदर्श संस्था पुरस्कारमहर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान नाशिक या संस्थेचा आदर्श संस्थेच्या पुस्काराने सन्मानित करण्यात आले, तर गायिका वैष्णवी नेरीकर यांना वैदही सर्जनशीलता पुरस्कारासोबतच सृष्टी पगारे व राशी पगारे या विद्यार्थिनींना विशेष प्रज्ञावंत पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे प्रणीता इंगळे, सोनिया शेख, वैष्णवी सरकाटे, ओम माने, यश टेलर, प्रज्ञा डागा, विक्रांत मेहता, प्रांजल कुलकर्णी व रणजित शर्मा यांना गुणवंत व प्रज्ञावंत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक