शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींचे राजकीय आखाडे करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:36 IST

नाशिक : देशातील ग्रामपंचायती म्हणजे ग्रामीण विकासाची केंद्रे आहेत. त्यांचे राजकीय आखाडे करू नका, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (दि. २१) महाराष्ट्र सरपंच संसदेत केले.

ठळक मुद्देसंजय राऊत : महाराष्ट्र सरपंच संसदेत प्रतिपादन

नाशिक : देशातील ग्रामपंचायती म्हणजे ग्रामीण विकासाची केंद्रे आहेत. त्यांचे राजकीय आखाडे करू नका, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (दि. २१) महाराष्ट्र सरपंच संसदेत केले.नाशिक येथील चोपडा लॉन्समध्ये नाशिक लोकसभा मतदार संघ व एमआयटी आॅफ गव्हर्नमेंट यांच्या ग्रामोन्नीतीतून देशोन्नती संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र सरपंच परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आदर्श गाव योजनेचे कार्यकारी संचालक पोपट पवार, एमआयटी स्कूलचे संचालक राहुल कराड, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, एमव्हीएसटीएफच्या संचालिका श्वेता शालिनी, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, शहराध्यक्ष सचिन मराठे, महेश बडवे आदी उपस्थित होते.संजय राऊत म्हणाले, प्रशिक्षित सरपंच असतील तरच आदर्श गावांची निर्मिती होऊ शकेल आणि आदर्श गाव स्पर्धा यासारख्या स्पर्धांची गरज उरणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायती राजकारणाचे आखाडे न होता ग्रामीण विकासाची केंद्रे बनली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, सहकार खात्यात विकासात्मक कामाचे नियोजन करण्यापेक्षा अनेक नकारात्मक गोष्टी असल्याने आपण विनंती करून सहकार खात्यापासून स्वत:ची मुक्तता करून घेतल्याचा गौप्यस्फोट करतानाच पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखविल्यामुळे पुन्हा आपल्याला ग्रामविकास राज्यमंत्रिपद मिळाल्याचे दादा भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितले. महाराष्टÑात २०० गावे दुष्काळी यंदा गत शंभर वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळ राहणार असल्याचे सांगतानाच देशातील १४ राज्यांमधील ३४० जिल्ह्णांमध्ये पाण्याचा संघर्ष पेटला आहे. महाराष्ट्रातही दोनशे गावांमध्ये भीषण दुष्काळाचे सावट असून, आत्तापासून पाण्याचे नियोजन करावे लागेल. आगामी काळात जगासमोर पिण्याच्या पाण्यासोबतच शेती सिंचन व जनावरांच्या पाण्याचा सर्वांत मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत आदर्श गाव योजनेचे कार्यकारी संचालक पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.वनविभागाच्या जागा हस्तांतरितराज्यातील दुष्काळी परिस्थिच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना करण्यासाठी वनविभागाच्या परिसरातील एक हेक्टरपर्यंतच्या जागा ग्रामपंचायतींना हस्तांतरित करण्याच्या सूचना वनविभागांना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांत संबंधित भूखंड ग्रामपंचायतींच्या नावावर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.