शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पुन्हा धावू द्या झुक झुक गाडी !

By admin | Updated: February 17, 2017 00:13 IST

कॉँग्रेसचा नॉस्टॉल्जिया : १९९२ मधील प्रस्तावित महापौर एक्स्प्रेसचे यंदाच्या जाहीरनाम्यात आश्वासन

 नाशिक : १९९२ मध्ये नाशिक महापालिकेत कॉँग्रेसची सत्ता आली त्यावेळी चर्चेत असलेल्या नदीकाठच्या मनोरंजक महापौर एक्स्प्रेसचे स्वप्न तेव्हा पूर्ण झाले नाही, परंतु आता हेच स्वप्न साकार करण्यासाठी कॉँग्रेस सज्ज झाली आहे. महापालिकेने यंदाच्या जाहीरनाम्यात महापौर एक्स्प्रेसचे स्मरण करून दिले आहे, त्याचप्रमाणे पालिकेत सुरुवातीची दहा वर्षे सत्ता असताना कॉँग्रेसच्या काळात ज्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले त्याची स्मरणचित्रे जाहीरनाम्यात देताना हा पक्ष नॉस्टॉल्जियात रमला आहे.कॉँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याचे गुरुवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यात अनेक जुन्या योजनांना उजाळा देण्यात आला आहे. महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीनंतर १९९२ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली. त्यातील १९९२ ते १९९५ आणि नंतर ९६-९७ या कालावधीत कॉँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर दोन वर्षे शिवसेना-भाजपा युतीकडे सत्ता गेली आणि १९९९ ते २००२ पर्यंत कॉँग्रेसकडे सत्ता आली. या दहा वर्षांच्या कारकिर्दीत चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके आणि बौद्ध स्मारक तसेच पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालय, कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण, गोदावरी कृती योजना तसेच स्व. दादासाहेब गायकवाड सभागृह यांची आपण बांधणी केली, परंतु आता या प्रकल्पांची दुरवस्था झाल्याचे नमूद करण्यात आली आहे. आमची दहा वर्षे, तुमची पंधरा वर्षे या अशा मथळ्याखाली त्यांनी ही चित्रे दिली असून त्यात ‘आम्ही साकारलेल्या प्रकल्पाची तुम्ही केली दुरवस्था’ असे त्यात म्हटले आहे.या नॉस्टॉल्जियाशिवाय कॉँग्रेसने १९९२ साली कॉँग्रेसची सत्ता आल्यानंतर त्यावेळी अशोकस्तंभ ते सोमेश्वर दरम्यान महापौर एक्स्प्रेस सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला होता, परंतु त्यावेळी वादविवादानंतर हा विषय बाजूला पडला होता. आता या योजनेचे विस्तारीकरण करून एकलहरे ते मुक्त विद्यापीठापर्यंत कॅनॉलमार्गाने महापौर एक्स्प्रेस सुरू करण्याचा मानस व्यक्त करण्यात येत आहे.नाशिक शहरातील गावठाण भागात चार चटई क्षेत्र असावे, या १९९७ सालच्या मागणीलाही जाहीरनाम्यात पुन्हा एकदा स्थान देण्यात आले आहे. याशिवाय गावठाण भागातील लाल किंवा निळी पूररेषाच नसावी, असे अजब आश्वासन देण्यात आले आहे. तसेच बससेवेचा रागही आळवण्यात आला आहे.तसेच शहरात स्काय वॉक, बहुमजली वाहनतळे, सौर शहर, बर्ड पार्क, बीओटीवर एलईडी दिवे, पवन ऊर्जा केंद्र, शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी टोल फ्री क्रमांक अशा काही नव्या योजनांचा समावेश करण्यात आला असला तरी बाकी अन्य अनेक योजना त्याच त्या आहेत.