नाशिक : मद्यासाठी पैसे आणले नाहीत या कारणावरून युवकावर कोयत्याने वार केल्याची घटना शनिवारी (दि़११) दुपारच्या सुमारास कॉलेजरोड परिसरात घडली़ गंगापूर पोलीस ठाण्यात प्रज्वल राजेंद्र भामरे (वय १९, राक़ामटवाडा) या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारच्या सुमारास तो मित्रांसह कॉलेजरोड परिसरातील टपरीवर चहा पित होता़ त्यावेळी तिथे आलेल्या संशयित अहेर याने चहा नाही, दारू दे असे सांगून पैशांची मागणी केली़ त्यास पैसे देण्यास नकार देताच अहेर यांनी बनियनमध्ये लपवून आणलेल्या कोयत्याने भामरेवर वार केला़ भामरेने हा वार हातावर झेलल्याने हातास गंभीर दुखापत झाल्याने त्यास मित्रांनी खासगी रुग्णालयात दाखल केले़, तर संशयित अहेर घटनेनंतर फरार झाला़या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित आकाश अहेर याच्यावर जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मद्यासाठी पैसे न दिल्याने कोयत्याने वार
By admin | Updated: March 12, 2017 20:47 IST