शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

निकाल लागूनही शुल्क परतीचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:34 IST

राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी भटके विमुक्त वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले जादा शुल्क परत करण्याचे आश्वासन देऊनही अद्यापही शुल्क परतीची कार्यवाही करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच शुल्क परत केले जाईल असे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, निकाल १ मार्चला जाहीर होऊनही शब्द पाळण्यात आला नसल्याचा आरोप भटके विमुक्त महासंघाने केला आहे.

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी भटके विमुक्त वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले जादा शुल्क परत करण्याचे आश्वासन देऊनही अद्यापही शुल्क परतीची कार्यवाही करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच शुल्क परत केले जाईल असे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, निकाल १ मार्चला जाहीर होऊनही शब्द पाळण्यात आला नसल्याचा आरोप भटके विमुक्त महासंघाने केला आहे.  तीन महिन्यांपूर्वी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये भटके विमुक्त संवर्गातील विद्यार्थ्यांना शुल्काची सवलत असतानाही त्यांच्याकडून खुल्या प्रवर्गाप्रमाणे शुल्क वसूल करण्यात आले होते. सदर बाब महाराष्टÑ भटक्या विमुक्त जाती-जमाती महासंघाच्या लक्षात आल्यानंतर महासंघाने शुल्क आकारण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे सांगून शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे अशी मागणी केली होती. शासनाच्या वतीने गेल्या डिसेंबर महिन्यात शिक्षणसेवक पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये भटक्या विमुक्त संवर्गातील उमेदवारांना सर्वसाधारण उमेदवारांप्रमाणेच ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले होते. शासनाच्या या निर्णयामुळे भटक्या विमुक्त उमेदवारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. वास्तविक शिक्षणसेवक म्हणून या चाचणीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी यापूर्वीच टीईटी चाचणी दिलेली आहे. त्या टीईटी झालेल्यांना चाचणी शुल्कामध्ये अनुसूचित जाती- जमातीप्रमाणे भटक्या विमुक्तांनाही परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आली होती. मात्र, आता अभियोग्यता चाचणीला परीक्षा शुल्क सवलत नाकारण्यात आलेली आहे. यासंदर्भात महाराष्टÑ भटक्या विमुक्त जाती-जमाती महासंघाचे अध्यक्ष हेमंत शिंदे यांनी जोरदार आवाज उठविला होता. त्यावेळी शासनाने आपली चूक मान्य करीत लवकरच विद्यार्थ्यांचे शुल्क परत केले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, पुन्हा दिरंगाई केल्यामुळे महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शुल्क परतीची मागणी केली असता निकाल जाहीर होण्यापूर्वीच शुल्क परत केले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आता १ मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला असताना शुल्काबाबत मात्र कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शासनाकडून दिशाभूलभटके विमुक्त संवर्गातील विद्यार्थ्यांकडून खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शुल्क आकारण्याची चूक मान्य करीत शासनाने जादाचे शुल्क परत करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु शासनाने वेळोवेळी भूमिका बदलत अखेरीस निकालाच्या पूर्वीच शुल्क परत केले जाईल असे सांगितले होते. मात्र, हा शब्द फिरविण्यात आल्यामुळे समाजाची दिशाभूल केली जात असल्याचे आणि शासनाला या प्रकरणाचे गांभीर्य नसावे असे दिसते.  - हेमंत शिंदे, अध्यक्ष,  महाराष्टÑ भटक्या विमुक्त जाती-जमाती महासंघ

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी