शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कर्तृत्ववान महिलांचा इतिहास  विसरू नका : सिंधूताई सपकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:39 IST

तथाकथित सुशिक्षित वर्गातील स्त्रियांकडून जगण्याच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला जातो. परंतु आजच्या युगात जगण्याचा आनंद घेताना आपली संस्कृतीशी नाळ तुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

नाशिक : तथाकथित सुशिक्षित वर्गातील स्त्रियांकडून जगण्याच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला जातो. परंतु आजच्या युगात जगण्याचा आनंद घेताना आपली संस्कृतीशी नाळ तुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ज्याला तुम्ही अडाणी म्हणता त्याच माय-बहिणींनी कर्तृत्वाने इतिहास घडविला आहे. त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी केले.आई फाउंडेशन व प्रयत्न संस्था यांच्या वतीने मातृदिनानिमित्त कालिदास कलामंदिरात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. आमदार सीमा हिरे, भारती गमे, नलिनी कड, नीता कोशिरे उपस्थित होत्या.याप्रसंगी विमल काळे, स्वाती पाटील, आशालता आडके, विमल धात्रक, गीताबाई ठाकरे, भिकूबाई बागुल, सखूबाई चुंबळे, फुलाबाई आहेर, आशा बनकर, पुष्पलता जेऊघाले, तुळसाबाई दाहिजे, मंगला शिंदे, सुनीता शिंदे, भगीरथी पाटील, मीराबाई रकिबे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सिंधूताई म्हणाल्या, शालिनतेने समाजाकडे बघितले पाहिजे, यावेळी महेश आडके, संदीप धात्रक, शिल्पा वाघ, पूजा शिनगार, पूनम पाटील, शिल्पा जेऊघाले, आकाश कोठारी आदी उपस्थित होते.प्रास्ताविक महेश अहिरे तर सूत्रसंचालन प्रा. नितीन अहेर यांनी केले, तर संदीप धात्रक यांनी आभार मानले.जीवनात अनेक संकटे येतात. कितीही मोठे संकट आले तरी न डगमगता त्याच्यावर पाय देऊन उभे रहा. जगा आणि जगू द्या, या आपल्या संस्कृतीने दिलेला विचार घेऊन वाटचाल करत रहा. जीवनात कितीही मोठे यश मिळाले, तरी मागे वळून पहायला शिका. शिक्षण घेताना संस्कार जपले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, सोपान वाटपाडे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान दिले.

टॅग्स :Nashikनाशिक