शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या वायदे बाजारावर बंदी घालू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:15 IST

नाशिक : जागतिक बाजारात तेलबियांचा तुटवडा असल्यामुळे सोयाबीनचे दर वाढले असले, तरी भाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने ...

नाशिक : जागतिक बाजारात तेलबियांचा तुटवडा असल्यामुळे सोयाबीनचे दर वाढले असले, तरी भाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने सोयाबीनच्या वायदे बाजारावर बंदी घालू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी या संदर्भात सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांना ई-मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे, मागील हंगामात निकृष्ठ बियाणे व अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी १०० टक्के नुकसान झाले असले, तरी सरासरी ३० ते ३५ टक्के नुकसान झालेले आहे. वाढीव दरामुळे शेतकर्‍यांचा मोठा फायदा होणार नाही, फक्त झालेले नुकसान भरून निघेल.

सोयाबीन प्रक्रिया उद्योग लॉबीकडून सोयाबीनचा वायदे बाजार बंद करण्याचे दडपण सरकारवर येत असले, तरी शेतकरीहित लक्षात घेऊन वायदे बाजारावर बंदी घालणे फायदेशीर ठरणार नाही.

चीनकडून अमेरिकेतील सोयाबीनला मोठी मागणी आहे. तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपल्या देशातून निर्यात होणार्‍या तेलावर बंदी घातली आहे किंवा निर्यात शुल्क वाढवले आहे. भारतातील सोयाबीन नॉन जी एम असल्यामुळे भारतातील सोया पेंडीला बर्‍याच देशात चांगली म‍ागणी आहे.

वायदे बाजारावर बंदी घातल्यास कच्चा माल स्वस्तात मिळेल व काही प्रक्रिया उद्योगांना अवाजवी नफा कमवण्याची संधी मिळेल. वायदे बाजार बंद केल्यास सोयाबीनच्या किमती कोसळतील व शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागेल. बंदी घालून भाव पडल्यास शेतकरी तेलबियांच्या पिकांकडे आकर्षित होणार नाहीत व देशापुढे पामतेल आयात करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.