शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये डान्सबारला परवानगी देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:47 IST

तरुण पिढी व अनेकांच्या संसाराचा विचार करता नाशकात डान्सबारला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नाशिक : तरुण पिढी व अनेकांच्या संसाराचा विचार करता नाशकात डान्सबारला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  निवेदनात म्हटले आहे की, आघाडी सरकारच्या काळात १३ वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबारवर बंदी आणली होती. डान्सबारमुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात आले, तसेच डान्सबारमध्ये पैसा उधळण्यासाठी तरुण गुन्हेगारीच्या व अवैध धंद्यांच्या आहारी गेले होते. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली.या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी घालण्याचा कायदा केला, परंतु युती सरकारने न्यायालयात विरोध प्रखरपणे न मांडल्यामुळे सरकारची बाजू कमकुवत राहिली, परिणामी महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबार सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्रात दुष्काळ असल्याने शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगारांपुढे रोजंदारीचा प्रश्न असल्याने अनेक तरुण मुले रोजंदारीसाठी या जाळ्यात अडकून आपले आयुष्य बर्बाद करण्याची शक्यता आहे. नाशिकमधील तरुण पिढीचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था टिकावी यासाठी डान्सबारला परवनागी देऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी अ‍ॅड. चिन्मय गाढे, नीलेश सानप, डॉ. संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, सागर बेदरकर, सुनील घुगे, नदीम शेख, मितेश राठोड, संतोष पुंड आदी उपस्थित होते.महाराष्ट्रात दुष्काळ असल्याने शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगारांपुढे रोजंदारीचा प्रश्न असल्याने अनेक तरुण मुले रोजंदारीसाठी या जाळ्यात अडकून आपले आयुष्य बर्बाद करण्याची शक्यता आहे. नाशिकमधील तरुण पिढीचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था टिकावी यासाठी डान्सबारला परवनागी देऊ नये.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसdanceनृत्य