नाशिक : संत ज्ञानेश्वर महाराज यांचे चरित्र प्रेरणादायी असून, त्यात जीवनातील सर्वच गोष्टींचा समावेश करण्यात आला असल्याचे विचार युवा संत प्रा डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे महाराज यांनी व्यक्त केले.पंचवटीतील अमृतधाम परिसरातील साईनगर रोडवरील वरदविनायक मंदिरासमोर संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी दिन स्मृती सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना प्रा. डॉ. गुट्टे महाराज म्हणाले की, जीवनात मन हे महत्त्वाची भूमिका बजावत असून, सर्व अध्यात्मक सिद्धी या मनावरच अवलंबून आहेत. संतांच्या संगतीमुळेच मनावर नियंत्रण मिळत असते. जेव्हा मन हे स्थिर होते तेव्हाच योगी आणि संतपद हे प्राप्त होत असते. कार्यक्रमास स्वामी संविदानंद सरस्वती, महापौर अशोक मुर्तडक यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सुनीता शिंदे, शोभा सुरोसे, नगरसेवक रुचि कुंभारकर, कोंडाजीमामा आव्हाड, फौजी महाराज सूर्यवंशी, सुनील केदार, संतोष शिंदे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक श्याम पिंपरकर यांनी, तर सूत्रसंचालन संजीव अहिरे यांनी केले.
ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र प्रेरणादायी
By admin | Updated: December 7, 2015 22:35 IST