शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दिवाळी पाडवा, भाऊबीज साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:19 IST

दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. या सणातील धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, आश्विन अमावास्या (लक्ष्मीपूजन) यानंतर येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा तथा बलिप्रतिपदा होय. गुरुवारी (दि. ८) बलिप्रतिपदा साजरी करण्यात आली. हा विक्र म संवत्सराचा वर्षारंभ दिन मानला जातो. बलिप्रतिपदा या दिवशी अभ्यंगस्नान केल्यानंतर पतीचे औक्षण करून पत्नी त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते.

नाशिक : दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. या सणातील धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, आश्विन अमावास्या (लक्ष्मीपूजन) यानंतर येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा तथा बलिप्रतिपदा होय. गुरुवारी (दि. ८) बलिप्रतिपदा साजरी करण्यात आली. हा विक्र म संवत्सराचा वर्षारंभ दिन मानला जातो. बलिप्रतिपदा या दिवशी अभ्यंगस्नान केल्यानंतर पतीचे औक्षण करून पत्नी त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते.दरम्यान, शुक्रवारी (दि.९) भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा भाऊबीज हा सण साजरा करण्यात आला. यानिमित्त बहिणीला भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. बलिप्रतिपदेला बळीराजाचे पूजन केले जाते. बळीराजा दृष्ट नव्हता, प्रजाहितदक्ष राजा म्हणून त्याची ख्याती होती. त्याचे राज्य सुराज्य असल्याने पुन्हा असेच राज्य प्रस्थापित व्हावेत अशी लोक त्या दिवशी प्रार्थना करतात. म्हणून बहीण भावाला ओवाळताना ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो, अशी कामना करते.बलिप्रतिपदानंतर शुक्रवारी (दि.९) भाऊबीज साजरी करण्यात आली. दिवाळी पाडवा व भाऊबीज हा भगिनीवर्गाने आपल्या भावांना औक्षण करून त्याच्या भरभराटीची दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी शुभचिंतन करण्याचा दिवस. या दिवसाला यमद्वितीया असे ही म्हणतात. यमीने आपला भाऊ यमराजाला आपल्या घरी बोलवून त्याचे औक्षण करून भोजन दिले. कितीही कष्ट पडले तरी आपली बहीण जिथे असेल तिथे म्हणजे तिच्या घरी जाऊन तिच्याकडून औक्षण करून घ्यावे तिला भेटवस्तू म्हणून साडीचोळी अन्य वस्तू देण्याची प्रथा आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात धनधान्य, समृद्धी लाभते अशी श्रद्धा आहे. भाऊ हा बहिणीच्या संरक्षणासाठी उभा आहे, अशी त्यामागची संकल्पना होय. दिवाळी पाडवा व्यापारी वर्गासाठी नवीन वर्षाची सुरु वात. या दिवशी ग्रामीण भागात काही ठिकाणी रेड्यांची मिरवणूक काढण्यात येते. पंचवटीतदेखील मिरवणूक काढण्यात आली. त्याचप्रमाणे काही ठिकाणी रेड्यांच्या शर्यती लावण्यात आल्या.

टॅग्स :NashikनाशिकDiwaliदिवाळी