शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

‘त्यांच्या’ वस्तीतली दिवाळी माणूसपण जागवणारी.

By admin | Updated: October 20, 2014 00:13 IST

‘त्यांच्या’ वस्तीतली दिवाळी माणूसपण जागवणारी.

.. सुदीप गुजराथी  नाशिक‘त्यांच्या’ वस्तीतल्या अरुंद गल्ल्यांमधले वातावरण जरासे उजळून निघते... कोंदट, अंधाऱ्या खोल्यांमध्ये पणत्यांचा प्रकाश पसरतो... त्यातल्याच एखाद्या खोलीत चक्क लक्ष्मीची पूजा मांडली जाते... मग ‘मालकीण’ हिंदू असो की मुस्लीम, दुनियेने निर्माण केलेल्या धर्माच्या, भेदभावाच्या भिंती इथे गळून पडतात अन् ‘त्यांची’ दिवाळी माणूसपणाने झळाळून निघते...हे वर्णन आहे शहरातील वेश्यावस्त्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या दिवाळीचे... समाजातली अन्य माणसे जेव्हा दिवाळीचा सण साजरा करण्यात रममाण झालेली असतात, तेव्हा परिस्थितीमुळे या व्यवसायात आलेल्या वेश्यांच्या वस्तीतही माणुसकीचे दिवे पेटलेले असतात... काही दिवसांसाठी का होईना, या महिलांच्या अंधारलेल्या आयुष्यात थोडासा उजेड आलेला असतो... नाशिक शहरात सात ते आठ ठिकाणी वेश्यांची वस्ती आहे. तेथे सुमारे सातशे ते आठशे महिला देहविक्रयाचा व्यवसाय करतात. (सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, शहरात सुमारे दोन ते अडीच हजार महिला या व्यवसायात आहेत; मात्र त्यांचा व्यवसाय छुप्या पद्धतीने सुरू असतो.) प्रत्येक वस्तीत अनेक खोल्या असलेल्या एकेका घरात सुमारे पन्नास-साठ महिला व्यवसाय करतात. एका महिलेच्या वाट्याला ‘नंबर’प्रमाणे दिवसातून दोन किंवा तीन ‘गिऱ्हाइके’ येतात. त्यातून तिला साधारणत: तीनशे रुपयांची कमाई होते. त्यातला काही भाग घरमालकिणीला द्यावा लागतो. वस्तीतल्या काही महिला तेथेच वास्तव्यास असतात, तर काही आपल्या घरून व्यवसायासाठी तेथे येतात. सकाळी ७ वाजेपासून ते रात्री १ पर्यंत व्यवसाय चालतो. दिवाळीच्या दिवसांत या वस्त्यांचे रूप थोडेफार बदलते. कुटुंबीय स्वीकारत असल्यास काही महिला सणाला घरी जातात. इतरांची दिवाळी मात्र वस्तीतच साजरी होते. तेथे साजऱ्या होणाऱ्या दिवाळीबद्दल या महिला भरभरून बोलतात, ‘दुनियेच्या दिवाळीची आम्हाला पर्वा नाही. आम्ही आमच्या परीने हा सण साजरा करतो. नवे कपडे घेतो, फराळाचे पदार्थ तयार करतो. इथे सगळ्या जाती-धर्मांच्या महिला राहत असल्या, तरी साऱ्या जणी सारख्याच उत्साहात दिवाळी साजरी करतात. इथल्याच एखाद्या घरात लक्ष्मीपूजन केले जाते. फटाकेही फोडतो. वस्ती हे आमचे कुटुंबच असते. त्यामुळे हक्काचे घर असले, तरी तिथल्यापेक्षा येथेच जास्त आनंद मिळतो...’समाजाकडून वेश्यांना अनेक दूषणे दिली जात असली, तरी या महिला मात्र समाजाविषयी चकार शब्दाचीही तक्रार करीत नाहीत... ‘आम्हीच असे काम करतो, लोकांना नावे कशाला ठेवू? लोक आमच्याशी चार शब्द गोड बोलतात, हेच खूप झाले... लोकांकडून आम्हाला दुसरे काहीही नको’, असे या महिला प्रामाणिकपणे सांगतात, तेव्हा त्यांचे हे शब्द त्यांच्यातल्या सच्चेपणाबरोबरच आयुष्याकडून त्यांना किती कमी अपेक्षा आहेत, याचीही जाणीव करून देतात...