शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रणालीच्या दोषामुळे ठेकेदार, कामगारांची दिवाळी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 17:11 IST

जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागातील बांधकामांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम. एस.) प्रणाली लागू केली आहे. १ एप्रिल २०१९ पासून नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व विभांगांच्या सर्व योजनांची व कामांची देयके प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीममधून अदा करण्यास सुरुवात झाली.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत देयके अडकली : फाईलींचा प्रवास पुन्हा लांबलाकामांची बिले प्रणालीत भरूनही पैसे वेळेत मिळत नसल्याने ठेकेदारांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागांतर्गत करण्यात येणाऱ्या बांधकामांची देयके आॅनलाइन सादर करून त्याआधारेच त्यांचे बिल अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेने विकसित केलेली प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम. एस.) प्रणालीच्या तांत्रिक दोषामुळे ठेकेदारांना देयके सादर करण्यास अडचणींचा सामना करावा लागत असून, गेल्या काही दिवसांपासून या प्रणालीची वेबसाईट बंद राहात असल्यामुळे ऐन दिवाळीत ठेकेदारांना पैशांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ठेकेदारांनाच बिल मिळत नसल्याने त्यांच्याकडे काम करणा-या कामगारांची दिवाळी संकटात सापडली आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागातील बांधकामांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम. एस.) प्रणाली लागू केली आहे. १ एप्रिल २०१९ पासून नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व विभांगांच्या सर्व योजनांची व कामांची देयके प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीममधून अदा करण्यास सुरुवात झाली. या प्रणालीमुळे विविध फाईलींचा प्रवास यामुळे थांबणार असून, विनाविलंब देयके अदा केली जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता. सुरुवातीला या प्रणालीस चांगला प्रतिसाद मिळाला. ठेकेदारांनी आॅनलाइन बिल भरल्यास त्यांना तत्काळ बिले अदा केली जात. परंतु, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या प्रणालीतील दोष समोर येऊ लागले आहेत. सदर प्रणालीसाठी असलेली वेबसाईट ही सतत बंद असते. सततच्या चालू-बंद सिस्टिममुळे वेळात बिले समीट करता येत नाही. सिस्टीममध्ये बिले भरल्यानंतर वेबसाईटवर ही बिले ठेकेदारांना दिसत नाही. प्रणाली लागू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले असले तरी, ही प्रणाली हाताळण्यास विभागातील कर्मचारी सपशेल अपयशी ठरत आहे. प्रणालीतील दोषामुळे कर्मचा-यांचा बराच वेळ जात असल्याने, फाईली काढण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने बिले काढण्यास विलंब होत असून, दोन दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली असून, प्रणालीतील तांत्रिक दोष तसेच कर्मचा-यांनी काम न करण्याची मानसिकता पाहता, कामांची बिले प्रणालीत भरूनही पैसे वेळेत मिळत नसल्याने ठेकेदारांमध्ये नाराजी आहे. ठेकेदारांना पैसे मिळत नसल्याने परिणामी ठेकेदारांकडे काम करणाºया मजुरांची दिवाळी संकटात सापडली आहे. जिल्हा परिषदेला २५ आॅक्टोबरपासून सुट्या लागणार असल्याने तत्पूर्वी प्रशासनाने ठेकेदार व मजुरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद