शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

दिवाळीत कोट्यवधींची उलाढाल; मरगळ झटकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:48 IST

दिवाळीत नाशिककरांनी जोरदार खरेदी केल्यामुळे बाजारपेठेत दिवाळीच्या तीन-चार दिवसांमध्ये सहाशे ते सातशे कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या वर्षभरातील नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बाजारपेठेला आलेली मरगळ दिवाळीच्या खरेदीने झटकल्यामुळे मंदीचे हे सावट दूर होऊन पुन्हा एकदा बाजाराला झळाळी प्राप्त झाल्याचे या दिवाळीत पहायला मिळाले.

नाशिक : दिवाळीत नाशिककरांनी जोरदार खरेदी केल्यामुळे बाजारपेठेत दिवाळीच्या तीन-चार दिवसांमध्ये सहाशे ते सातशे कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या वर्षभरातील नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बाजारपेठेला आलेली मरगळ दिवाळीच्या खरेदीने झटकल्यामुळे मंदीचे हे सावट दूर होऊन पुन्हा एकदा बाजाराला झळाळी प्राप्त झाल्याचे या दिवाळीत पहायला मिळाले.  शहरातील बाजारपेठेत लक्ष्मीपूजन व पाडव्याच्या मुहूर्ताबरोबरच भाऊबिजेनिमित्तानेही खरेदीला उधाण आले होते. ग्राहकांना आकर्षक योजना, नव्या तंत्रज्ञानाने भरपूर उत्पादने आणि बँका व फायनान्स कंपन्यांकडून मिळणाºया कर्जसुविधांचा फायदा घेत ग्राहकांनी खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. यंदा दिवाळीच्या खरेदीत मोबाइल आणि सोन्याबरोबरच आॅटोमोबाइल बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याचा झाली असून, सोने खरेदीसाठी लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा व भाऊबीज या तिन्ही दिवाळी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून  आली.  इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या खरेदीसाठी शहरातील दुकाने व शोरुम्स गर्दीने फुलून गेली होती. व्यापाºयांनी खरेदीवर विशेष सवलती आणि आॅफर्सही दिल्यामुळे खरेदीला सवलतींची झालर मिळाली. मोबाइल फोन, टॅबलेट, लॅपटॉप यांसह गृहोपयोगी वस्तूंमध्ये फ्र ीज, वॉशिंग मशीन, घरगुती आटा चक्की, व्हॅक्युम क्लीनरच्या नवीन मॉडेल्सना मागणी असल्याचे दिसून आले.  बँका आणि फायनान्स कंपन्यांनी अगदी शून्य टक्के दराने अर्थपुरवठा केल्यामुळे या संधीचा ग्राहकांनी चांगलाच फायदा घेतला. काही शोरूममध्ये अगदी एक रु पया भरूनही वस्तू घरी घेऊन जाण्याची संधी देण्यात आली होती. उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये भरून घेण्यासाठी फायनान्स कंपन्या पुढे आल्यामुळे वस्तू खरेदीसाठी पूर्ण रक्कम हातात नसूनही ग्राहकांना ती घरी घेऊन जाता येत असल्याने बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण दिसून आले.रेडिमेड गारमेंट व्यावसायिकांची दिवाळीऐन दिवाळीच्या सणात शहरातील मॉल, रेडिमेड गारमेंटमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. दिवाळीपूर्वीच्या आठवडाभरात परतीच्या पावसाने नागरिकांना खरेदीसाठी घराबाहेर पडता आले नव्हते. परंतु शनिवारपासून (दि.१४) पावसाने उघडीप दिल्याने ग्राहकांची बाजारपेठेत एकच गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. खरेदीचा हा ओघ ऐन दिवाळी सणातही कायम असल्याचे दिसून आले.नव्या-जुन्या वाहनांची खरेदीचारचाकी श्रेणीत प्रवासी व व्यावसायिक वाहनांच्या बाजारात तेजी दिसून आली. त्याचप्रमाणे जुन्या वाहन बाजारातही ग्राहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून आली. दिवाळीच्या निमित्ताने अनेक ग्राहकांनी जुनी वाहने बदलून नवीन वाहने खरेदी केली, तर अनेकांनी जुने वाहन बदलून चांगल्या स्थितीतील जुनेच वाहन खरेदी केले.गृहप्रकल्पांना ग्राहकांची भेटदिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेक ग्राहकांनी आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बुकिंग केले, तर ज्यांना घराचा ताबा मिळाला अशा ग्राहकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश केला. दिवाळीनिमित्त असलेल्या सुट्या आणि घर खरेदीचे स्वप्न असलेल्या ग्राहकांनी विविध बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देऊन घरांची पाहणी केली. तसेच मध्यस्थांच्या माध्यमातून खरेदी-विक्रीचे व्यवहारही वाढल्याचे दिसून आले.घरपोच साहित्य देण्यासाठी कसरतदिवाळीत इलेक्ट्रॉनिक वस्तू व वाहनांचे शोरुम गर्दीने फुलून गेले होते. शहरातील विविध शोरुम्स आणि दुकानदारांनी लकी ड्रॉ जाहीर करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. या ड्रॉविषयी ग्राहकांमध्ये आकर्षण दिसून आले. दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केलेले साहित्य ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी शोरूममालकांना आणि कर्मचाºयांना कसरत करावी लागली.