सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागातील बारशिंगवे येथे दिव्यांग बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, गटविकास अधिकारी किरण जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी वेंधे, सरपंच वसंत बोराडे, उपसरपंच पोपट लहामगे यांनी मार्गदर्शन केले.दिव्यांग बांधवांच्या उद्योगासंदर्भात त्यांच्या स्वत:च्या संकल्पना जाणून घेतल्या. त्यातून प्लॅस्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी करून सामान्य जनतेला कापडी पिशव्या शिवून देणे, कापडी मास्क तयार करणे, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश शिवून देणे,भातापासून लाह्या, बेकरी उत्पादने तयार करून हॉटेल व किरकोळ ग्राहकाला पाव व इतर उत्पादन गुणवत्तापूर्ण व माफक दरात देणे, निव्वळ नैसर्गिक पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या सेंद्रिय नागलीपासून पापड व बिस्किटे तयार करणे यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दिव्यांगांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:49 IST
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागातील बारशिंगवे येथे दिव्यांग बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी बैठक पार पडली.
दिव्यांगांची बैठक
ठळक मुद्देसेंद्रिय नागलीपासून पापड व बिस्किटे तयार करणे यांवर सविस्तर चर्चा