शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्तांची घोटविहीर गावाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 14:31 IST

पेठ - तालुक्यातील घोटविहीरा व उंबरमाळ भागात डोंगराला पडलेल्या भेगामुळे घाबरलेल्या जनतेची विभागीय आयुक्त राजाराम माने व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी भेट घेऊन पाहणी केली.

पेठ - तालुक्यातील घोटविहीरा व उंबरमाळ भागात डोंगराला पडलेल्या भेगामुळे घाबरलेल्या जनतेची विभागीय आयुक्त राजाराम माने व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी भेट घेऊन पाहणी केली. तसेच स्थलांतरीत नागरिकांशी चर्चा करून दिलासा दिला.तालुक्यात गत सप्ताहात कोसळलेल्या धुंवाधार पावसाने प्रारंभी निरगुडे येथे जमिनीतून निघालेल्या बुड बुडयामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पाठोपाठ घोटविहीरा येथे डोंगरास उभी भेग पडल्याने डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उंबरमाळ या वस्तीला धोका संभवणार असल्याची शक्यता ध्यानी घेऊन प्रशासनाने रातोरात नागरिकांचे स्थलांतर नजिकच्या करंजपाडा गावात करण्यात आले. तर दोन दिवसाच्या अंतराने लिंगवणे गावाच्या शिवारात जमीन खचल्याचा प्रकार घडल्याने भुकंप होइल या भयाने तालुकावासीयांना पछाडल्याने प्रशासनही हतबल झाले होते. या पाशर््वभूमिवर शासनाने गांभीर्या ने दखल घेऊन भूगर्भीय हलचालीचा सुक्ष्म अभ्यास करणारी या संस्थेचे तांत्रीक अधिकारी बेडवाल यांच्यासह विभागीय आयुक्त राजाराम माने , जिल्हाधिकारी सुरज मांढरे, प्रांतधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी घटनास्थळी भेट दिली. अतिवृष्टीने डोंगरात पाणी मुरल्याने तसेच रस्ता बनवितांना डोंगरमध्यावर कापला जात असल्याने डोंगरातील पोकळभागात पाणी मुरत असल्याने असे प्रकार उदभवत असल्याचे मत नोंदविण्यात आले असले तरीही त्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. पेठचे तहसिलदार हरीश भामरे, व हरसुलचे पोलीस निरिक्षक शिवाजी बढे या दोघा अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास स्वत: गावात तळ ठोकून उंबरमाळच्या ग्रामस्थांना रात्रीतून करंजपाडा येथे हलवले. याबद्दल वरिष्ठांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी विनोद मेढे, विनधकारी ठोंबल , मंडळ अघिकारी गोतरणे , तलाठी उत्तम चेबाळे , पोलीस पाटिल यशवंत चौधरी, सुभाष चौधरी ,ग्रामसेवक पाचोरे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक